Indurikar Maharaj

इंदुरीकर महाराज अपघातातून थोडक्यात बचावले ! चालक जखमी

437 0

जालना- कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातातून ते थोडक्यात बचावले. इंदोरीकर महाराज हे परतूर शहरात रात्री कीर्तनासाठी जात असताना त्यांच्या स्कॉर्पिओ कार लाकडं वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला धडकली. या अपघातात त्यांच्या कारचा चालक जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील परतूर येथे बुधवारी (13 एप्रिल) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून कीर्तनासाठी निघाले असता शहरातील साईनाथ कॉर्नरजवळ हॉटेल मधूबन समोरील रस्ताक्रॉस करणाऱ्या लाकडं वाहून नेणारी ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरवर महाराजांची स्कॉर्पिओ जाऊन आदळल्याने हा अपघात झाला आहे.

या अपघातात इंदुरीकर थोडक्यात बचावले मात्र त्यांचा चालक जखमी झाला. अपघातानंतर पोलिसानी महाराजांना दुसऱ्या वाहनातून कीर्तनासाठी खांडवीवाडी रवाना केले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमी चालकावर
सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

Share This News

Related Post

शिवसेनेचे बये दार उघड अभियान; शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविली जाणार मोहीम

Posted by - September 25, 2022 0
देशात आणि राज्यात आदिशक्तीचा जागर असलेला नवरात्रीचा उत्सव सुरू होत असून विजयादशमीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची ऐतिहासिक सभा ही…

CRIME NEWS : बनावट कॉल सेंटरद्वारे फसवणूक करणारी टोळी गजाआड; हिंजवडी पोलिसांची कारवाई..(VIDEO)

Posted by - August 3, 2022 0
पिंपरी – चिंचवड : नामांकित इलेक्ट्रॉनिक कंपनीचं बनावट कॉल सेंटर तयार करून, सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी – चिंचवडच्या…

हॉटेलच्या रुममध्ये जुळ्या मुलींसहित एकाच कुटुंबातील चौघांचे आढळले मृतदेह

Posted by - April 1, 2023 0
दोन जुळ्या मुलींसह पती-पत्नीचे मृतदेह हॉटेलच्या रूममध्ये आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना कर्नाटकात मंगळुरू येथील एका लॉजमध्ये उघडकीस…

शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपदी निवड तर दीपक केसरकर मुख्य प्रवक्ते

Posted by - July 18, 2022 0
मुंबई: शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार असून या सुनावणीआधी शिंदे घटना मोठी खेळी खेळली असून…

दत्तात्रेय जयंती 2022 : श्री दत्तजयंतीचे महत्व, दत्तात्रेय बीज मंत्र, गुरुचरित्र वाचन सप्ताह समाप्ती, पौर्णिमा तिथी वाचा सविस्तर माहिती

Posted by - December 7, 2022 0
दत्तात्रेय जयंती 2022 : दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भगवान दतात्रेय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *