#IRCTC टूर पॅकेज : भारतीय रेल्वे फक्त 7 हजारात तिरुपती बालाजीची भेट घडवून देणार, जाणून घ्या पॅकेजशी संबंधित सविस्तर माहिती

2309 0

जगभरात आपल्या संस्कृती आणि परंपरेसाठी प्रसिद्ध असलेला भारत धार्मिक स्थळ म्हणूनही खूप लोकप्रिय आहे. दरवर्षी अनेक लोक केवळ सुंदर पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी येत नाहीत, तर येथे असलेली मंदिरे पाहण्यासाठी देखील येथे पोहोचतात. या मंदिरांपैकी एक तिरुपती बालाजी देखील जगभरात खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी देश-विदेशातील लोक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात. नुकतेच आयआरसीटीसीने तिरुपती बालाजीसाठी खास टूर पॅकेज जारी केले आहे. चला तर मग जाणून घेऊया या पॅकेजशी संबंधित सर्व आवश्यक तपशील

प्रवास कधी सुरू होणार ?
आयआरसीटीसीने जारी केलेल्या या टूर पॅकेजचा कालावधी तीन रात्र आणि चार दिवसांचा असेल. हा प्रवास २१ मार्चपासून सुरू होणार असून या तारखेपासून २६ मार्चपर्यंत तुम्हाला दररोज गाडी मिळणार आहे. आपण आपल्या सोयीनुसार प्रवासाची तारीख निवडू शकता. या खास टूर पॅकेजला तिरुपती बालाजी दर्शन एक्स मुंबई असे नाव देण्यात आले आहे. हे टूर पॅकेज मुंबईहून सुरू होईल म्हणजेच तुम्हाला तिरुपती बालाजीला जाणारी मुंबई ट्रेन मिळेल.

असे असेल प्रवासाचे वेळापत्रक
या टूर पॅकेजअंतर्गत तुम्ही एमजीआर चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास कराल. भारतीय रेल्वेच्या या टूर पॅकेजची सुरुवात मुंबईतून होणार आहे. पण मुंबईव्यतिरिक्त पुणे आणि सोलापूरयेथूनही ही गाडी पकडता येणार आहे. या यात्रेअंतर्गत तुम्हाला आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल आणि प्रवास संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा मुंबई, पुणे किंवा सोलापूर स्थानकावर सोडले जाईल.

भाडे किती असेल ?
भाड्याबद्दल बोलायचे झाले तर आयआरसीटीसीने तिरुपती बालाजीसाठी जारी केलेल्या या पॅकेजचे भाडे अत्यंत कमी ठेवले आहे. या प्रवासाअंतर्गत तुम्हाला ट्रेनमध्ये थर्ड एसी आणि स्लीपर कोचमध्ये प्रवास करता येणार आहे. जर तुम्ही थर्ड एसी बुक करत असाल तर त्यासाठी तुम्हाला एका व्यक्तीसाठी 12100 रुपये, दोन व्यक्तींसाठी 10400 रुपये आणि तीन लोकांसाठी 10300 रुपये मोजावे लागतील. तर जर तुम्हाला स्लीपर तिकीट मिळत असेल तर तुम्हाला एका व्यक्तीसाठी 9050 रुपये, दोन व्यक्तींसाठी 7390 रुपये आणि तीन लोकांसाठी 7290 रुपये मोजावे लागतील.

टूर पॅकेजमध्ये मिळणार ‘या’ सुविधा
आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजसाठी निश्चित करण्यात आलेल्या भाड्याबरोबरच तुम्हाला अनेक सुविधाही मिळणार आहेत. या सुविधांमध्ये रेल्वे भाडे, तिरुपतीमध्ये एक रात्रीचा हॉटेल मुक्काम, एक वेळचे जेवण आणि नाश्ता, प्रेक्षणीय स्थळे, बालाजी मंदिर दर्शन पास, लोकल टूर गाईड, ट्रॅव्हल इन्शुरन्स, जीएसटी आदी सुविधांचा समावेश आहे. प्रवासाशी संबंधित सविस्तर माहितीसाठी तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. याशिवाय माहिती किंवा बुकिंगसाठी ही तुम्ही आयआरसीटीसीच्या कार्यालयात जाऊ शकता.

Share This News

Related Post

शारदा सहकारी बँक ‘कॉसमॉस’ बँकेत विलीन करण्यास रिझर्व बँक ऑफ इंडियाची मंजुरी

Posted by - October 30, 2022 0
पुणे: आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या श्री शारदा सहकारी बँकेचे कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत विलीनीकरण, एकत्रीकरणाच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शनिवारी (दि.29)…
vodafone

दूरसंचार कंपनी व्होडाफोन ‘या’ कारणामुळे 11 हजार लोकांना कामावरुन काढणार

Posted by - May 16, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटीश दूरसंचार कंपनी व्होडाफोनने (Vodafone) पुढील तीन वर्षांत 11,000 नोकर्‍या (Job) आपल्या कंपनीतून कमी करणार…

विधान परिषद निवडणूक: आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - June 20, 2022 0
मुंबई:- विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच पक्षांसाठी ही विधान परिषद निवडणूक प्रतिष्ठेची आहे. निवडणुकीसाठी आजारी असतानाही भाजपाचे…

कसबा विधानसभा पोटनिवडणूक : पुण्यात निकालापूर्वीच रवींद्र धंदेकर यांच्या विजयाचे बॅनर ? वाचा काय आहे प्रकरण…

Posted by - February 28, 2023 0
पुणे : २६ फेब्रुवारी रोजी कसबा विधानसभा पोटनिवडणूक पार पडली आहे. येत्या दोन मार्च रोजी कोणता उमेदवार गुलाल उधळणार हे…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Posted by - March 30, 2022 0
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय धुळवडच सुरु आहे. यात केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि राजकीय कुस्ती सुरु…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *