Medicines

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! धोकादायक 14 फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी

546 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने 14 औषधांवर बंदी घातली आहे. डीजीसीआय (DCGI) म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळाने (Drugs Controller General of India) हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी, 3 जून रोजी हा निर्णय घेतला आहे.

भारताकडून 14 औषधांवर बंदी
भारत सरकारने 14 प्रकारच्या फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDC – Fixed Dose Medicine) औषधांवर बंदी (Ban) घातली आहे. या औषधांचा संबंधित रोगांवर होणारा परिणाम आणि उपचारात्मकतेबाबत स्पष्टता आढळून आल्याने डीसीजीआयने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलत 14 प्रकारच्या FDC कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे.

फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषध म्हणजे काय?
दोन किंवा अधिक घटक एकाच औषधात एकत्र मिसळलेले असणे म्हणजे फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDC – Fixed Dose Medicine) होय. यामध्ये Nimesulide + Paracetamol dispersible गोळ्या आणि Pholcodine + Promethazine या सारख्या घटकांचा समावेश आहे.

डीजीसीआयच्या मागणीनंतर केंद्राचं मोठं पाऊल
या औषधांच्या उपचाराबाबत कंपनीला स्पष्टीकरण नसल्याने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच या औषधांमुळे आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे डीसीजीआयच्या तज्ज्ञ समितीला आढळून आल्याने ही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

Share This News

Related Post

पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात नसून हत्याच ! आरोपीची कबुली, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - February 15, 2023 0
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रात वादाची नवीन ठिणगी पडली आहे. दरम्यान संशयास्पद परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाल्यामुळे…

ऊसतोड मजूर व महिला यांचे प्रश्न प्रशासनाने समन्वयाने सोडवावेत – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - October 1, 2022 0
बीड : ऊसतोड मजूर व महिला यांचे प्रश्न प्रशासनातील संबंधित विभागांनी समन्वयाने सोडवावेत, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…

मार्च महिन्यामध्ये 1.42 कोटी रुपयांचा विक्रमी GST जमा

Posted by - April 1, 2022 0
नवी दिल्ली- देशात जीएसटीचा कायदा लागू केल्यानंतर आतापर्यंतचा विक्रमी जीएसटी मार्चमध्ये जमा झाला आहे. या मार्चमध्ये 1.42 लाख कोटी रुपयांचा…

#Weather Forecast : पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; पुढचे 4 तास ‘या’ जिल्ह्यात खबरदारीचा इशारा

Posted by - March 16, 2023 0
पुणे : पुण्यात सकाळपासूनच वाटेवर ढगाळ होते. दुपारी पुण्यात आणि परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. हवामानखात्याने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *