हिवाळी अधिवेशनात सीमा प्रश्नावरून वातावरण तापले; ‘सीमाप्रश्न बाबत ठराव आणणार!’, उपमुख्यमंत्री म्हणाले “आपलं ठरलं होतं…”

207 0

नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा आहे. पहिल्या दिवसापासून हिवाळी अधिवेशनाचे वातावरण चांगलेच तापले आहे. ते सीमा प्रश्नावरून…! हे वातावरण अद्याप देखील थंड झाले नसून, सीमा प्रश्न बाबत ठराव आणणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटले आहे. हा ठराव उद्या विधिमंडळात मंजूर होणार आहे.

कर्नाटकनच्या विधानसभेत महाराष्ट्राविरोधी ठराव मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज विरोधकांकडून कडाडून विरोध झाला. यानंतर सीमाप्रश्नाबाबत ठराव आणणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल आहे. हा ठराव उद्या विधिमंडळात मंजूर केला जाणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण इंच इंच जागेचा विचार करू. सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्र सरकार समोर आपण सीमावरती भागातील नागरिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी जे करायचं असेल ते करू. आपलं ठराव आणण्याचं ठरलं होतं. आज तो ठराव आपण मांडला होता. मुख्यमंत्री आज दिल्लीला केंद्राच्या कार्यक्रमासाठी गेले. त्यामुळे ते आज जर आले तर आज किंवा उद्या हा ठराव आपण मांडू या संदर्भात आपण तर सुभरही मागे हटणार नाही… असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Share This News

Related Post

राज्यपालांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; आजपासून 7 दिवस राज्यभर करणार आंदोलन

Posted by - December 4, 2022 0
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी राज्यपाल यांच्या…

पहिल्या पतीला सोडलं, केलं दुसरं लग्न; तिसऱ्यानेच पाठवले पत्नीला तसले व्हिडिओ, मोबाईल पाहून पतीची पायाखालची जमीनच सरकली…

Posted by - March 8, 2023 0
उत्तराखंड : हल्द्वानी मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलेने पहिलं लग्न केलं होतं. पण हे पहिलं लग्न…

#ONLINE RUMMY : ऑनलाइन रमीची जाहिरात करणारे हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील हे प्रसिद्ध कलाकार गोत्यात ? गुन्हा दाखल करण्याची मागणी

Posted by - January 27, 2023 0
सध्या सोशल मीडियावर ऑनलाइन रमीची जोरदार जाहिरात सुरू आहे. विशेष म्हणजे ही जाहिरात सर्वसामान्य कलाकार करत नसून हिंदी चित्रपट सृष्टीतील…
Heavy Rain

Monsoon Update : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने दिली ‘ही’ मोठी अपडेट

Posted by - July 29, 2023 0
पुणे : सध्या राज्यात पावसाने (Monsoon Update) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणचे नदी- नाले तुडुंब भरून वाहताना…
Mumbai Coastal Road

Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड अखेर खुला!

Posted by - March 11, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दक्षिण मुंबईतील वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *