BREAKING NEWS : गणेश स्थापना आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात दारू दुकाने बंद

249 0

पुणे : गणेश स्थापना आणि विसर्जनाच्या दिवशी जिल्ह्यात दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिनांक 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस जिल्ह्यातील दारू दुकाने बंद राहणार आहेत. 10 तारखेला विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत महापालिका क्षेत्रातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशीही ज्या भागात गणेश विसर्जन असणार त्याभागातील दारू दुकाने बंद राहणार आहेत. यांनी हे आदेश दिले आहेत.

शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा आदेश जारी केला आहे. यासाठी अशा दुकानांवर वॉचही ठेवला जाणार आहे. कुठेही गैरप्रकार आढळल्यास किंवा आदेशाचे पालन न झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत असून या काळात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने मद्यविक्री करणारी दुकाने, परमीट रूम आणि बिअर बार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित व्हावे. उत्सव काळातील इतर दिवशी दिलेल्या वेळेनंतरदेखील दुकानदार दारू विक्री चालु ठेवतात. अशा बेकायदा कामास आळा घालण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमार्फत अचानक तपासणी केली जाणार आहे.

मद्यनिषेध अधिनियम 1949मधील नियम 142अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात अशाप्रकारचे आदेश देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार पत्रक काढले आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरण सिंग राजपूत यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. 121 राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरण सिंग राजपूत बंदचा कालावधी आणि बंदचे क्षेत्र 31 ऑगस्ट – पूर्ण पुणे जिल्हा 09 सप्टेंबर – पूर्ण पुणे जिल्हा 10 सप्टेंबर – पुणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर् मद्य विक्री अनुज्ञती, विसर्जन मिरवणूक संपेपर्यंतच्या कालावधीकरिता गणेशोत्सवाचा 5वा आणि 7वा दिवस (संपूर्ण दिवस) – ज्या भागांत पाचव्या आणि सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते, अशा भागात नियम लागू

Share This News

Related Post

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘देवगिरी’ शासकीय निवासस्थानी गुढी उभारुन साजरा केला गुढी पाडवा

Posted by - March 22, 2023 0
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील ‘ देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी गुढी उभारली तसेच गुढीची…

नोटबंदी निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ‘हा’ मोठा निर्णय, नोटबंदी विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या; केंद्र सरकारला…

Posted by - January 2, 2023 0
नवी दिल्ली : 2016 मध्ये केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता. हा निर्णय होता नोटबंदीचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

तुमच्यातल्या ‘या’ पाच सवयी तुम्हाला असफल होण्यास कारणीभूत ठरत आहे; आजच विचार करा !

Posted by - January 21, 2023 0
अनेक वेळा पण प्रचंड मेहनत करत असतो पण तरीही यश पदरी पडत नाही. हातातोंडाशी आलेला घास निघून जातो, मग आपण…

#ELECTIONS : कसब्यात मतदात्यांचा अल्प प्रतिसाद ; कसबा आणि चिंचवडच्या मतदानाची आतापर्यंतची किती आहे टक्केवारी, वाचा सविस्तर

Posted by - February 26, 2023 0
पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु आहे. दोन्ही प्रमुख पक्षांसाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *