गुजरातेत घड्याळाचे काटे फिरले ! राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा पक्षाला रामराम

267 0

गुजरातमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे फिरल्याचं पाहायला मिळतंय. गुजरातमधील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार कंधाल जाडेजा यांनी पक्षाला रामराम केलाय. कोण आहेत हे कंधाल जाडेजा ? पाहूयात…

गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना तेथील राष्ट्रवादी पक्षाला मोठा झटका बसलाय. गुजरातमधील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार कंधाल जाडेजा यांनी पक्षाची साथ सोडलीये. कंधाल जाडेजा हे कुटियाना मतदारसंघातून 2012 पासून निवडून येत आहेत. 2012 आणि 2017 या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 50 टक्क्यांहून अधिक मतं घेऊन भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना धूळ चारली होती.

2022 च्या यंदाच्या निवडणुकीतही त्यांना कुटियाना मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. 11 नोव्हेंबर रोजी त्यांनी या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज देखील भरला होता. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी केलेल्या आघाडीमुळं ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानं जाडेजा यांचा हिरमोड झाला. कंधाल जाडेजा यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत बोस्के यांनी दिली.

राज्यसभा तसेच राष्ट्रपती निवडणुकीवेळी जाडेजा यांनी पक्षादेश झुगारून भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, पक्षाच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्याची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात येईल, असं राष्ट्रवादीनं म्हटलंय. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 1 आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी मतदान होत असून 92 हा बहुमताचा आकडा आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आप हे तीन पक्ष समोरासमोर उभे ठाकले आहेत.

एकूणच काय तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर हातातलं घड्याळ उतरवून ठेवणारे राष्ट्रवादीचे कंधाल जाडेजा आता अपक्ष म्हणून निवडणूक लढणार की इतर पक्षाला साथ देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Share This News

Related Post

Ajit Pawar

NCP MLA disqualification case : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच ! अजित पवारांचे 41 आमदार पात्र

Posted by - February 15, 2024 0
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी पक्षासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा (Ajit…
Prakash Ambedkar and Eknath Shinde

खुशखबर! दीक्षाभूमी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रकाश आंबेडकरांच्या ‘या’ मागण्या मान्य

Posted by - July 5, 2024 0
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा १८८३८ मतांनी विजय

Posted by - April 16, 2022 0
कोल्हापूर- शेवटपर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी बाजी मारत भाजपच्या सत्यजित कदम यांचा १८८३८ मतांनी…

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Posted by - February 13, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल काँग्रेसचा हात सोडत पक्षाच्या सदस्यपदाचा…

‘सरकारला सुबुद्धी दे’; पुण्यात राम मंदिरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आरती, पाहा व्हिडिओ

Posted by - April 12, 2023 0
घरपट्टीची वाढीव बिले तत्काळ रद्द करावी, पुणेकरांची घरपट्टी पूर्ववत व्हावी, तसेच घरपटी थकबाकीदारांवर सावकारी पद्धतीने लावले जात असलेले व्याजही तत्काळ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *