आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

289 0

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले

जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय. राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार.

जळगांव जिल्ह्यातील कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देणार. २२२६ कोटी सुधारित खर्चास मान्यता.

आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार

खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड. राज्यातील ग्रामीण भागात सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणार.

गगनबावडा आणि जत तालुक्यात मौजे संख येथे होणार ग्राम न्यायालय

शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना. नाममात्र नोंदणी व मुद्रांक शुल्क आकारणार

राज्यात काजू फळपिक विकास योजना लागू होणार. कोकणातील शेतकऱ्यांना होणार फायदा.

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात ६० टक्के वाढ. वाचनसंस्कृतीला मिळणार बळ.

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करणार. कालबाह्य तरतुदी काढणार. कारावासाऐवजी वाढीव दंडाची तरतूद

१३ सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासनाने बँकेस देय असलेली रक्कम अदा करणार.

पुणे जिल्ह्यातील आंबेगांव बु. येथील शिवसृष्टी प्रकल्पास ५० कोटी अनुदान देणार

पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, कर्जत या स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठांना मान्यता

महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा अधिनियमात शिक्षेच्या सुधारित तरतुदी. ‘ईज ऑफ डुईंग बिझिनेस’ साठी निर्गुन्हेगारीकरण करणार

राज्यातील शाळांना अनुदान. ११०० कोटींना मान्यता

महाअधिवक्ता श्री आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत

Share This News

Related Post

पिंपरी चिंचवड ते पुणे कोर्ट आणि पुणे कोर्ट ते कोथरूड दरम्यान मेट्रोची तांत्रिक चाचणी आज !

Posted by - December 31, 2022 0
पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी चिंचवडकर ज्या मेट्रो ट्रायलची आतुरतेने वाट पाहत आहेत. ती मेट्रो ट्रायल आज पूर्ण होत…

नाशिक पदवीधर निवडणूक: सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय

Posted by - February 3, 2023 0
नाशिक: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीला पराभव करत सत्यजित…

उपेक्षित समाज घटकांच्या विकासात विनायक मेटे यांचं मोठं योगदान – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

Posted by - August 14, 2022 0
मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचं  अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध विकासकामांचे उद्घाटन

Posted by - June 3, 2022 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.…

कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड ; बॉलीवूडवर शोककळा

Posted by - September 21, 2022 0
मुंबई : कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *