पुन्हा बंधनं नको असतील तर; कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं ‘हे’ आवाहन

381 0

राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत: हून मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रुग्णांमध्ये फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळल्यास त्यांची तत्काळ आरटीपीसीआर टेस्टींग करा, राज्यातील टेस्टिंगची संख्या तसेच लसीकरणाचा वेग वाढवा अशा सूचनाही दिल्या.

कोविड संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्याशी संवाद साधून कोविड स्थितीचा आढावा घेतला. बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह टास्कफोर्स चे अध्यक्ष डॉ संजय ओक, सदस्य शशांक जोशी डॉ राहुल पंडित यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोरोना अजून संपलेला नाही, काळजी घेणे आवश्यक

कोरोना अजून संपलेला नाही, जगभरात त्याचे नवनवीन विषाणु जन्माला येत आहेत. चीनमध्ये ४० कोटी जनता सध्या लॉकडाऊन मध्ये आहे. आपणही कोविडच्या तीन लाटांचा यशस्वीपणे मुकाबला केला असला तरी आपल्या काही आप्तस्वकीयांना गमावले आहे, यासाठी लावलेल्या निर्बंधांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली, अनेकांचे रोजगार या काळात गेले. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला कोविड अनकूल वर्तणूक अंगिकारणे आवश्यक आहे. राज्यात आपण या तीन लाटांच्या काळात सुरु केलेल्या आरोग्य सुविधा आपण बंद केल्या नसल्या तरी त्या वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ नये अशी आपली प्रार्थना असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Share This News

Related Post

Sharad Pawar

राष्ट्रवादीला मोठा धक्का! पवारांच्या ‘हा’ खास शिलेदार करणार भाजपात प्रवेश

Posted by - May 15, 2023 0
पुणे : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाने एक वेगळे वळण घेतले आहे. अशातच आता काही दिवसांवर निवडणूका येऊन ठेपल्या आहेत.…

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्यांचा पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते गौरव

Posted by - March 27, 2023 0
पुणे : पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह सन-२०२० व विशेष सेवा पदक सन-२०२० विजेत्यांना पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य…
Satara Crime

Satara Crime : पाटण- पंढरपूर मार्गावर आढळला मृतदेह

Posted by - November 14, 2023 0
सातारा : पाटण- पंढरपूर राज्यमार्गावर (Satara Crime) चरेगाव (ता.कराड) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी…

ठाकरे गटाला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; ‘धगधगती मशाल’ पक्ष चिन्हाबाबत अखेर निर्णय

Posted by - October 19, 2022 0
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांच्यासमोर गेल्या पाच महिन्यांपासून सातत्याने आव्हान उभे राहते आहे. पक्षातील मोठ्या बंडखोरीनंतर शिवसेना कोणाची आणि…
Latur News

Latur News : सांगवी-सुनेगाव येथे बस – ट्रकचा भीषण अपघात; 29 जण जखमी

Posted by - August 17, 2023 0
लातूर : लातूर-नांदेड (Latur News) राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी-सुनेगाव या ठिकाणी काल सायंकाळच्या सुमारास बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *