“मराठी भाषिकांवरील अन्याय येत्या 48 तासात थांबले नाहीत तर मलाही बेळगावात…!” आणि शरद पवार संतापले

221 0

बेळगाव : कर्नाटकमध्ये आज महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले करण्यात आले. दगडफेक आणि सातत्याने कर्नाटक सरकारकडून होणारे चितावणीखोर वक्तव्य पाहता सीमावाद आता चिघळला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, येत्या 24 तासात वाहनांवरचे हल्ले थांबले नाहीत तर, संयमाला रस्ता पाहायला मिळेल. या स्थितीची जबाबदारी कर्नाटक सरकारवर असेल हे चित्र घडत असताना दोन्हीही मुख्यमंत्र्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता होती. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संपर्क साधला म्हणाले पण त्याचा काही परिणाम झाला नाही. हे वेळीच थांबलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते असे ते म्हणाले.

बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केले. गाड्या रोखल्या…. तसेच बेळगाव आणि इतर मराठी भाशीक परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केलं जात असून, यामुळे महाराष्ट्रातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचाही बांध फुटतोय. 23 नोव्हेंबरला जत संबंधित यांनी भूमिका मांडली. 24 नोव्हेंबरला अक्कलकोट बद्दल बोलले फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही अशी टीका देखील केली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही स्टेटमेंट सातत्याने केली आहेत सीमा भागातील स्थिती गंभीर झाली आहे.

देशाला ज्यांनी संविधान दिलं थोर महात्म्याच्या स्मरणाच्या दिवशी जे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर घडलं ते निषेधार्ह आहे. हे प्रकरण काही आठवड्यापासून एका वेगळ्याच स्वरूपात नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा आहे. अजूनही महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका संयमाची आहे. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडूनच चितावणीखोर भूमिका घेतली जाते आहे. सहकाऱ्यांकडून हल्ले घडत आहेत देशाच्या ऐक्याला हा फार मोठा धोका आहे हेच काम कर्नाटकातून होत असेल तर केंद्र सरकारला बघायची भूमिका घेऊन चालणार नाही असे देखील यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.

Share This News

Related Post

#Mental Health : नैराश्यामुळे उचलले जाते टोकाचे पाऊल; अशी ओळखा लक्षणे, आपल्या जवळच्या माणसाला मानसिक त्रासातून वाचावा

Posted by - March 27, 2023 0
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेहिने वाराणसीतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून सर्वांनाच धक्का बसला आहे.…

धार्मिक भावना आपल्या घरात ठेवाव्यात; हनुमान चालिसेवरून रंगलेल्या राजकारणावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Posted by - April 25, 2022 0
राज्यात सध्या हनुमान चालिसावरुन राजकारणात कलगीतुरा रंगू लागला आहे. राणा दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा…

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान; असा असेल प्रस्थान सोहळा

Posted by - June 11, 2023 0
टाळ – मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर – फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त…
Ashok Chavan

Ashok Chavan : ‘…म्हणून मला भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली’; अशोक चव्हाणांनी केले स्पष्ट

Posted by - February 16, 2024 0
नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी 12 फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर आपण काँग्रेसची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *