VIDEO : दहीहंडी हा खेळ क्रिडा प्रकारात समविष्ट करुन घेतला तर त्याला वेगळे प्रलय प्राप्त होईल – डॉ. श्रीकांत शिंदे

211 0

धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तीच तरुणाईची धुम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा शुक्रवार 19 ऑगस्ट 2022 रोजी टेंभीनाक्यावर पहायला मिळणार आहे.

हा दिमाखदार सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे. गेले दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही दहीहंडी फक्त पारंपारिक पध्दतीने साजरी करण्यात आली. परंतु या वर्षी पुन्हा धर्मवीरांची ही मानाची हंडी त्याच उत्साहात आणि जल्लोषात साजरी होणार आहे. हा दिमाखदार सोहळा साजरा करताना ठाणे व मुंबईतील गोविंदा पथकांकरीता प्रत्येकी रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. दहीहंडी हा पारंपारिक उत्सव असला तरी तो एक साहसी खेळ आहे, त्यामुळे या उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

या दहीहंडी महोत्सवात मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील मोठ्या आणि जास्त थर लावणाऱ्या गोविंदा पथकासाठी प्रत्येकी 2 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी 1,00,000/- रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 12,000 हजार, सहा थरांसाठी 8,000 हजार, पाच थरांसाठी 6000 हजार तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 5000 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी रॅपलिंगसाठी असणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले. तसेच या दहीहंडी उत्सवात नामवंत गायक तसेच चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य व संगीतमय जल्लोष असणार आहे. तसेच सुप्रसिध्द मराठी व हिंदी चित्रपट व मालिकांमधील प्रसिद्ध नायक/नायिका उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार सुप्रसिध्द लावणी सम्राज्ञी आपल्या आकर्षक नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन तसेच या उत्सवात आपल्या सुमधूर व जल्लोषमय गाण्यांनी येणाऱ्या गोविंदांना बेधुंद करणार आहेत. त्याचबरोबर उत्तम असा साउंड तसेच नेत्रदिपक रोषणाई या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहे.दही हंडी हा सण गोविंदा आला की खेळला गेला नसुन वर्षभर हा खेळ खेळला गेला पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री यांना केली आहे. या खेळाला साहसी दर्जा मिळाला पाहिजे. तसेच शाळेमध्ये देखील खेळला गेला पाहिजे. दहीहंडी हा खेळ क्रिडा प्रकारात समविष्ट करुन घेतला तर त्याला वेगळे प्रलय प्राप्त होईल .

Share This News

Related Post

झुंड सिनेमाबाबत काय म्हणाला अभिनेता रितेश देशमुख…?

Posted by - March 10, 2022 0
झुंड सिनेमाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. नुकतीच रितेश देशमुखनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं झुंड…
Jalgaon Accident

Jalgaon Accident : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईकस्वारांना धडक

Posted by - January 11, 2024 0
जळगाव : जळगावमधून एक भीषण अपघाताची (Jalgaon Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त वेग जीवावर बेतू शकतो याचा…

राज ठाकरे भाजपचे अर्धवटराव, धनंजय मुंडे यांची टीका

Posted by - April 20, 2022 0
सांगली- राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु…

महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार- आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

Posted by - September 28, 2022 0
पुणे : राज्यातील साडेतीन कोटी माता-भगिनींची आरोग्य तपासणी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार असून या अभियानाच्या…

चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

Posted by - March 1, 2023 0
पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षक, सहायक आणि सूक्ष्म निरीक्षकांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *