#INFORMATIVE : आधार कार्ड हरवले तर… ? अशी असते प्रक्रिया, माहिती असू द्या !

470 0

आपले आधार कार्ड हरवले असेल तर विशिष्ट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते आपल्याला पुन्हा मिळू शकते.

आधार कार्ड संबंधातील कोणत्याही तक्रारी दूर करण्याकरिताwww.uidai.gov.in या संकेतस्थळावर दाद मागण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळावरून ई नंबर डाउनलोड करून आपल्याला यासंदर्भातील तक्रारी कळवता येऊ शकतात.

त्याकरिता आपला रजिस्टर मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अशी माहिती द्यावी लागते. ही माहिती दिल्यानंतर आपल्याला ई-आधार मिळते. यावरून आपण एन्रोलमेंट क्रमांकही डाउनलोड करू शकतो. आधार कार्ड तयार करण्यापूर्वी या कार्डची एन्रोलमेंट प्रक्रिया सुरू केली जाते. यानुसार एका विशिष्ट केंद्रावर नागरिकांची बायोमेट्रिक आणि अन्य माहिती एकत्रित केली जाते.

असे केल्यानंतर नागरिकांना एक पावती दिली जाते. यालाच एन्रोलमेंट पावती म्हणतात. या क्रमांकाच्या आधारे आपण आपले कार्ड सध्या कोणत्या स्थितीत आहे याची माहिती मिळवू शकतो. ही सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्यांचे आधार कार्ड हरवले आहे ते आपल्या कार्ड नंबरच्या साहाय्याने डुप्लिकेट कार्ड मिळवू शकतात. या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर आधार कार्डच्या मोनोग्राम खाली सिलेक्ट हा पर्याय आपल्याला मिळतो.

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अनेक पर्याय संगणकाच्या स्क्रिनवर दिसू लागतात. त्यातील रेसिडंट पोर्टल या पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यावर ईआयडी/युआयडी असे दोन पर्याय समोर येतात. रेसिडेंटवर क्लिक केल्यावर नवीन पान उघडले जाते.

या पानावर आधार कार्ड या पर्यायाकरिता महिलेचे चित्र दिसेल. त्या चित्राखाली ईआयडी/युआयडी हे पर्याय दिसतील. जर तुमची एन्रोलमेंट स्लीप हरवली असेल तर ईआयडीवर क्लिक करा. आधार कार्ड हरवले असेल तर युआयडी या पर्यायावर क्लिक करा. असे केल्यानंतर एक फॉर्म आपल्याला दिसू लागतो. या फॉर्ममध्ये आपले नाव, एन्रोलमेंट करताना दिलेला मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी ही माहिती भरावी लागते. ही माहिती भरल्यानंतर चार आकडी सिक्युरिटी कोड दिसू लागतो. तो क्रमांक आपल्याला सादर करावा लागतो. असे केल्यानंतर स्क्रिनवर गेट ओटीपी (वन टाईम पासवर्ड) दिसू लागतो.

त्यावर क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्या मोबाईलवर वन टाईम पासवर्ड दिला जातो. हा पासवर्ड सादर केल्यानंतर मोबाईलवरच ईआयडी अथवा युआयडी क्रमांक कळवला जातो. आधार कार्डकरिता तुम्हाला देण्यात आलेल्या युआयडी क्रमांकांच्या माध्यमातून युआयडीएआय पोर्टलवर जाऊन ई-आधार डाउनलोड करता येते.

आधार कार्ड कोणत्या स्थितीत आहे हे माहिती करून घेण्यासाठी https://eaadhaar.uidai.gov.in/ अथवा https://portal.uidai.gov.in/uidwebportal/enrolmentStatusShow.do या लिंकवर क्लिक करावे लागते. त्यावरून आपले आधार कार्ड तयार झाले आहे की पाठवले गेले आहे अथवा अजून तयार व्हायचे आहे याबाबतची माहिती मिळू शकते.

Share This News

Related Post

#Data आणि #Information यात फरक आहे ! नेमकं काय ? तुम्हाला हे माहित असायला हवं

Posted by - March 9, 2023 0
आपण डेटा आणि माहितीबद्दल ऐकले असेल, परंतु त्यांच्यातील मूलभूत फरकाबद्दल आपल्याकडे काही माहिती आहे का? नसेल तर हा लेख तुमच्या…

यासिन मलिक याला फाशी की जन्मठेप ? आज दुपारी होणार निर्णय

Posted by - May 25, 2022 0
नवी दिल्ली- काश्मिरी फुटरतावादी नेता यासिन मलिक याला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज दुपारी साडेतीन वाजता त्याच्या शिक्षेबाबत…

चांदणी चौक पूल 1 व 2 ऑक्टोबर दरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार ; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Posted by - September 27, 2022 0
पुणे : मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट…

TOP NEWS SPECIAL REPORT : हार्दिक पटेलांना भाजपची उमेदवारी; कसा आहे हार्दिक पटेल यांचा राजकीय प्रवास

Posted by - November 11, 2022 0
कधीकाळी भाजपच्या प्रमुख टीकाकारांपैकी एक असणारे हार्दिक पटेल यांना भाजपानं वीरमगाम मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा हार्दिक…

डोक्यावरुन खूप पाणी गेलंय, आता बघाच; भाजपचे साडेतीन नेते कोठडीत असतील – संजय राऊत (व्हिडिओ)

Posted by - February 14, 2022 0
नवी दिल्ली- आम्ही खूप सहन केलं आम्ही, बरबाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय ? आता बघाच, असा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *