बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 94.22 टक्के यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल

291 0

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभाग अव्वल, कोकण विभागाचा निकाल 97.21% इतका लागला आहे. निकालात यंदाही मुलींची बाजी यंदाच्या वर्षाच्या निकालात ही मुलींची बाजी.विद्यार्थिनींचा एकूण निकाल 95.35 टक्के तर विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 93.29 टक्के इतका लागला आहे. 24 विषयांचा निकाल 100 % एकूण 153 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के इतका लागला आहे.

दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. तसेच मोबाइलवरही एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहता येणार आहे. निकाल ऑनलाईन जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

यंदा ७५ टक्के लेखी अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तर किमान ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली होती. तसंच तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रकल्प यासाठी दोन कालावधी देण्यात आले होते. तसंच ७० ते १०० गुणांच्या प्रश्न पत्रिकांसाठी यंदा ३० मिनिटं जादा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. तर ४० ते ६० गुणांच्या प्रश्न पत्रिकांसाठी १५ मिनिटं जादा वेळ देण्यात आला होता. शाळा तिथं परीक्षा केंद्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं. बारावीच्या निकाल यंदाही मुलींनी बाजी मारली असून ९५.३५ टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ९३.२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विभागनिहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.
कोकण- ९७.२१ टक्के
पुणे- ९३.६१ टक्के
नागपूर- ९६.५२ टक्के
औरंगाबाद- ९४.९७ टक्के
मुंबई- ९०.९१ टक्के
कोल्हापूर- ९५.०७ टक्के
अमरावती- ९६.३४ टक्के
नाशिक- ९५.०३ टक्के
लातूर- ९५.२५ टक्के

Share This News

Related Post

नितीन गडकरी यांना धमकी देणारा जयेश पुजाराकडून मोबाईल आणि सीमकार्ड जप्त; नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले…

Posted by - March 24, 2023 0
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देणारा आरोपी जयेश पुजारी याच्याकडून धमकी देण्यात आलेला मोबाईल आणि सीमकार्ड जप्त करण्यात…
Pune Crime

Pune Crime : खळबळजनक ! लष्कराच्या जवानाकडूंन ट्रॅफिक हवालदारावर प्राणघातक हल्ला

Posted by - October 27, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात वाहतुकीचे नियम अनेकदा पायदळी तुडवले जातात. या सगळ्यांना…

नवीन घर खरेदी करताय; तर ही आहे तुमच्या कामाची बातमी

Posted by - June 30, 2023 0
आता घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अडकून पडलेले लाखो गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार निधी देणाऱ्या त्यामुळं घर खरेदी…

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! 40% मिळकत करातील सवलत कायम राहणार

Posted by - March 17, 2023 0
पुणे: पुणेकरांना मिळकतकरात वर्षानुवर्षे मिळणारी ४० टक्क्यांची सवलत कायम ठेवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी…

यंदा माऊलींची पालखी ११ जूनला आळंदीतून प्रस्थान ठेवणार

Posted by - April 12, 2023 0
यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायीवारीसाठी ११ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती प्रमुख विश्वस्त योगेश देसाई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *