बिहारमध्ये नितीश-तेजस्वी सरकार; आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या नितीश कुमार यांची कशी आहे राजकिय कारकीर्द ?

219 0

पाटणा: भाजपशी फारकत घेतल्यानंतर जेडीयूने पुन्हा राजदशी  संसार थाटलाय आणि जेडीयूचे नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

21 महिन्यांपूर्वीच नितीशकुमार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मागील 17 वर्षांमध्ये तब्बल आठव्यांदा नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, हा बिहारमध्ये एका प्रकारे वेगळाच रेकॉर्ड आहे.

नितीशकुमार यांच्यासोबत आरजेडी नेता आणि लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी सुद्धा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

सलग आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नितीशकुमार यांचा राजकीय प्रवास

  • ११ मार्च १९५१ रोजी बिहारमधील बख्तियारपूरमध्ये नितीश कुमार यांचा जन्म झाला. १९७२ मध्ये त्यांनी पटनामधील एका कॉलेजमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर बिहार वीज महामंडळामध्ये कर्मचारी म्हणून काही काळ नोकरी केली
  • १९७४ मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी सरकारविरोधात आंदोलनात नितीश कुमार यांनी सहभाग घेतला होता.
  • ६९ वर्षीय नितीश कुमार यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९७७ मध्ये झाली.
  • जनता दल पार्टीकडून १९७७ मध्ये नितीश कुमार पहिल्यांदा विधानसभा निवडणूकीत उतरले.
  • १९९० मध्ये नितीश कुमार यांना पहिल्यांदाच मंत्रीमंडळात स्थान मिळालं होतं. त्यांच्याकडे कृषी राज्य मंत्रीपद सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर रेल्वे मंत्रालय आणि कृषी मंत्रालयाची जबाबदारीही त्यांना सांभाळली आहे.
  • २००० मध्ये नितीश कुमार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. त्यांचा कार्यकाळ फक्त सात दिवसांचा होता.
  • आपल्या वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत नितीश कुमार यांनी तब्बल पाच वेळा आपले राजकीय भूमिका बदलल्यामुळे बिहारच्या राजकारणातले पलटूराम म्हणून देखील त्यांच्यावर विरोधक टीका करत असतात तर बिहार निवडणुकांच्या वेळेस नितीश कुमार सबके है अशा आशयाचे फलक देखील बिहारमध्ये लागले होते.
Share This News

Related Post

महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार- आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

Posted by - September 28, 2022 0
पुणे : राज्यातील साडेतीन कोटी माता-भगिनींची आरोग्य तपासणी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार असून या अभियानाच्या…
Amruta Fadnavis

देहविक्रीला प्रोफेशन म्हणून मान्यता द्या, अमृता फडणवीस यांची मागणी (व्हिडिओ)

Posted by - June 11, 2022 0
पुणे- भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता द्या अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी…

PHOTO : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन

Posted by - August 24, 2022 0
पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन घेतले. यावेळी देहू संस्थानचे नितीन महाराज…

दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेत प्रचंड गोंधळ ! सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना घेरले

Posted by - December 22, 2022 0
नागपूर : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनातही पाहायला मिळाले. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना…

#SMART PHONE : हे आहेत 10,000 च्या रेंज मधील लेटेस्ट स्मार्ट फोन ! पाहा स्वस्त स्मार्टफोनची यादी

Posted by - February 28, 2023 0
#SMART PHONE : युजरसाठी त्याचा स्मार्टफोन अनेक अर्थांनी खास आणि महत्त्वाचा असतो. केवळ कॉलिंगसाठीच नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहण्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *