पुणेकरांना हुडहुडी! थंडीचा जोर आणखी वाढणार ?

189 0

पुणे : मॉन्सून परतल्यानंतर राज्यात हिवाळा सुरू होऊन हळूहळू थंडीला सुरुवात होते. पुण्यात मात्र गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या तापमानात सातत्याने घट होत आहे. कडाक्याच्या थंडीची चाहूल पुणेकरांना जाणवू लागली आहे. या आठवड्यातील किमान तापमानात कसे बदल होत गेले आहेत ग्राफिक्सद्वारे पाहूया.

किमान तापमान ( अंश सेल्सिअस )

23 ऑक्टोबर 2022 – 15.8

24 ऑक्टोबर 2022 – 14.4

25 ऑक्टोबर 2022 – 13.7

26 ऑक्टोबर 2022 – 14.3

27 ऑक्टोबर 2022 – 14.3

28 ऑक्टोबर 2022 – 13.8

29 ऑक्टोबर 2022 – 15.8

उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू झाल्याने आणि सध्या पावसाचे कोणतेही लक्षण नसल्याने, या आठवड्यात थंडी वाढणार असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. साधारणपणे दिवाळीच्या दिवसांमध्ये विदर्भात थंडी जोर धरते. मात्र, यंदा मॉन्सून काहीसा लांबल्याने थंडीचही अपेक्षेप्रमाणे उशिरा आगमन झालं.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरात पहाटे कडाक्याची थंडी पडत असून, दिवसभर ‘ऑक्टोबर हिट’चे चटके बसतात आणि सायंकाळ होताच हवेत गारवा पसरतो आहे. पहाटेच्या सुमारास थंडीची तीव्रता अधिक जाणवते. राजस्थानकडून मध्य भारताकडे थंड वारे वाहू लागल्याने मध्य प्रदेश, छत्तीसगडसह महाराष्ट्र आणि विदर्भातही सध्या थंडीची सौम्य लाट पसरली आहे. त्याचा प्रभाव शहरासह राज्यातही जाणवू लागला आहे.

भारतीय हवामान विभागानुसार, उत्तर भारतातील पहाडी भागांत बर्फवृष्टी सुरू झाल्याने काही दिवस थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

Pimpri Chinchwad News

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडमध्ये हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

Posted by - August 30, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मधील (Pimpri Chinchwad News) चिखली भागात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास…

“माझे काम हे खुली किताब आहे, त्यांनी जरूर कोल्हापुरात यावं…!” हसन मुश्रीफांचा किरीट सोमय्यांना सल्ला

Posted by - January 13, 2023 0
कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयावर आणि घरावर इडी आणि आयकर विभागाने धाड टाकली होती. यावेळी…
Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं! वाढदिवसाला जाण्याच्या बहाण्याने दोन मित्रांनी मैत्रिणीवरच केले अत्याचार

Posted by - January 31, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime) एका मैत्रीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मित्रांनीच एका तरुणीचा घात केला आहे.…
Gadchiroli News Murder

Pune Crime : खळबळजनक ! नातेवाईकाच्या मुलीला अपशब्द वापरल्याने पुण्यात तरुणाची हत्या

Posted by - March 26, 2024 0
पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरूणाच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण…
School

Teacher Recruitment : ZP शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आता कायमच्या बंद; ‘पवित्र’द्वारे होणार भरती

Posted by - September 5, 2023 0
सोलापूर : राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका व महापालिकांमधील 23 हजार तर खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील 8 ते 10 हजार शिक्षकांची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *