Crime

हनीट्रॅप टाकून तरुणीने व्यावसायिकाकडून लुबाडले १७ लाख ५० हजार रुपये, पुण्यातील धक्कादायक घटना

563 0

बलात्काराची केस करण्याची धमकी देऊन एका व्यावसायिकाला १७ लाख ५० रुपयांचा गंडा घालणाऱ्या तरुणीला आणि तिच्या वकील साथीदाराला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

निधी दीक्षित(वय २५, रा. वाघोली) असं या तरुणीचं नाव असून विक्रम भाटी (वय ३५, रा. हडपसर) असं फसवणूक करणाऱ्या वकिलाचे नाव आहे. हा प्रकार ३ ऑगस्ट पासून सुरु होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक असून ते त्यांचा मित्र व त्याची मैत्रिण यांच्याबरोबर सिजन मॉल येथील एका रेस्टारंटमध्ये गेले होते. तिथे त्यांच्या टेबलवर एक मुलगी आली. तिने लायटर मागण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी ओळख करुन घेतली. आपले नाव निधी दीक्षित असून मुंबईहून पुण्यात आले असून बिझनेस करण्यासाठी तुमची मदत लागेल, असे सांगून त्यांचा मोबाईल नंबर घेतला.

त्यानंतर तिने फिर्यादी यांना व्हॉटसअ‍ॅप कॉल करून तिने बिझनेसबाबत बोलायचे आहे, असे सांगून भेटण्यासाठी बोलावले. फिर्यादी यांना तिच्या वाघोलीतील फ्लॅटवर नेले. तेथे ती बेडरुममध्ये गेली व पारदर्शक नाईट ड्रेस घालून बाहेर आली. फिर्यादी यांच्या शेजारी बसून तिने ४-५ क्लोज सेल्फी काढले. त्यानंतर ती परत बेडरुममध्ये गेली. ड्रेस बदलून बाहेर आली व फिर्यादी यांना तू येथे कशाला आलास, येथे काय काम आहे तुझे, येथून चालता हो, असे बोलली. अचानक तिने आपला पवित्रा बदलल्याने फिर्यादी घाबरुन तेथून निघून आले व त्यांनी तिचा मोबाईल ब्लॉक केला.

त्यानंतर १५ नोव्हेबर रोजी वकील विक्रम भाटी याने निशा गुप्ता हिच्या मोबाइलवरून फिर्यादी यांना फोन करून निधी दीक्षित यांनी तुमच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार केली आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी भाटी याने फिर्यादीकडे ८ लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे आपल्याकडे नसल्याने फिर्यादीने आपल्या गळ्यातील सोन्याची चेन, लॉकेट असे ६ तोळ्याचे सोने निशा गुप्ता हिला देऊन मुथूट फायनान्समध्ये तारण ठेवून विक्रम भाटे याला पैसे दे असे सांगितले.

त्यानंतर देखील विक्रम भाटी हा फिर्यादींना वेळोवेळी फोन करून लुबाडत राहिला. त्यानंतर निशा हिने फिर्यादी यांना सांगितले की, विक्रम भाटे, निधी दीक्षित,
वैभव शिंदे हे लोकांना जाळ्यात फसवून त्यांच्याकडून पैसे लुबाडतात. तुलाही फसवून पैसे काढण्याकरिता सांगितले होते. परंतु फिर्यादी माझा चांगला मित्र आहे मी तसे काही करणार नाही, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दाखल केली.

Share This News

Related Post

पुणेकरांनो ! गुरुवारी ‘या’ भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

Posted by - October 11, 2022 0
पुणे : पुणे शहराच्या काही भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी म्हणजे 13 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. पाणीपुरवठा बंद असणारे भाग ; …
Bhandara Crime

Bhandara Crime : भंडारा हादरलं ! बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भावाने मर्यादा ओलांडत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Posted by - December 26, 2023 0
भंडारा : भंडारा जिल्ह्यातून (Bhandara Crime) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये सख्या भावाने बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत लहान…

भाजपच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

Posted by - July 12, 2022 0
मुंबई : भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषित केले.   …
Crime

वाकड येथे पोलिसांच्या अंगावर आरोपीनं सोडलं कुत्रं ! गांजा विक्रीप्रकरणी कारवाई दरम्यान घडली घटना

Posted by - September 18, 2022 0
पिंपरी-चिंचवड शहरात गांजा विक्री करणाऱ्या तडीपार आरोपीस पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर, आरोपींनी चक्क पाळीव कुत्रा सोडून हल्ला चढवला. या घटनेत पोलीस…

पुणे : …आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता संतापले … VIDEO

Posted by - September 10, 2022 0
पुणे : पुण्याच्या गणपती विसर्जन सोहळ्यास यावर्षी चांगलाच विलंब झाला आहे. मानाच्या पाचव्या गणपतीचे विसर्जन देखील शुक्रवारी रात्री उशिरा झाले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *