होळी, धुळवड साजरी करण्याबाबतची नियमावली मागे, ठाकरे सरकारचा निर्णय

429 0

मुंबई- होळी आणि धुळवड साजरी करण्यावर राज्य सरकारकडून काही निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र या निर्बंधाला विरोधकांकडून होत असलेला विरोध पाहून ठाकरे सरकारने हे निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आज 17 मार्च रोजी होळीचा सण साजरा होत आहे. आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक नियमांचे पालन करुन साजरा करावा.असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. सरकारकडून नियमावली देखील जारी करण्यात आली होती. मात्र विरोधकांकडून होत असलेल्या टीकेनंतर राज्यसरकारने सर्व निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे यंदा होळी आणि धुळवड धुमधडाक्यात साजरी करता येणार आहे.

होळी आणि धुलिवंदन साजरी करण्यास कोणतीही सरकारी हरकत नाही. मात्र,दक्षता पाळून साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवर असलेल्या प्रशासकीय नियमांचे पालन आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.

काय होती नियमावली ?

रात्री दहाच्या आत होळी पेटवणे बंधनकारक

होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी

राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जोरात लाऊड स्पीकर लावू नये

होळी साजरी करताना मद्यपान आणि उद्धट वर्तन केल्यावर सुद्धा संबंधितांवर कारवाई होणार

होळी सणानिमित्त जमा होणाऱ्या महिलांची व मुलींची कोणीही छेड काढणार नाही, याबाबत काळजी घ्यावी.

कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा नको

धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.

कुठेही आग लागेल असे कृत्य करू नये

Share This News

Related Post

हायस्पीड बुलेट ट्रेन धावणार समुद्राखालून, किती वर्षात तयार होणार अंडर सी बोगदा ?

Posted by - April 8, 2023 0
मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणारी हायस्पीड बुलेट ट्रेन समुद्राखालील बोगद्यामधून धावणार आहे. लवकरच देशातील पहिल्या अंडर सी बोगद्याच्या कामाला सुरवात होणार आहे.…

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

Posted by - December 19, 2022 0
नागपूर: आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी,…
Dhangar Reservation

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - December 26, 2023 0
लातूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना धनगर आरक्षणाची (Dhangar Reservation) मागणी जोर धरताना दिसत आहे. सरकारकडून आश्वासन मिळूनही…
manoj-jarange-patil

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाला किती कोटी खर्च झाला? मनोज जरांगेनी भरसभेत हिशोबच मांडला

Posted by - October 14, 2023 0
जालना : अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सभेला मराठा समाजाने विराट गर्दी केलीय. सभेच्या सुरुवातीला…
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : “महाराष्ट्रात मराठा समाज शिल्लकच राहणार नाही..” छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य

Posted by - December 6, 2023 0
राज्यात मराठा आरक्षणाची मागणी सुरु असतानाच ओबीसी व मराठा नेत्यांमध्ये आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास अजित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *