हायस्पीड बुलेट ट्रेन धावणार समुद्राखालून, किती वर्षात तयार होणार अंडर सी बोगदा ?

458 0

मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणारी हायस्पीड बुलेट ट्रेन समुद्राखालील बोगद्यामधून धावणार आहे. लवकरच देशातील पहिल्या अंडर सी बोगद्याच्या कामाला सुरवात होणार आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते ठाण्यातील शिळफाटा या मार्गावर असणार्‍या २१ किमी लांबीच्या बोगद्यासाठी अॅफकॉन्सने सर्वात कमी किमतीची बोली लावल्याची माहिती समोर आली आहे.

मान्सूनपूर्वीच या कामाचा शुभारंभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुलेट ट्रेनवरील बीकेसी आणि शिळफाटा स्थानकांदरम्यान ठाणे खाडीवर हा बोगदा असेल. बीकेसी ते शिळफाटा हे अंतर जवळपास ३५ किलोमीटर इतके आहे. वर्क ऑर्डर निघाल्यानंतर, बोगदा पूर्ण होण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे.

२०२८ ही मुंबई-अहमदाबाद मार्गावरील या बोगद्याची डेडलाईन आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यास आणखी किमान तीन वर्षांचा कालावधी लागण्याची चिन्हं आहेत. या संपूर्ण कामास ६४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बोगद्याच्या २१ किमी पैकी १४ किमी अंतर अंडरग्राऊण्ड जमिनीखाली, तर उर्वरित सात किमी अंतर ठाणे खाडीखाली असणार आहे.

“प्रस्तावित हायस्पीड बुलेट रेल्वे कॉरिडॉर ठाणे खाडीतून जाणार आहे. हा भाग फ्लेमिंगो आणि जवळच्या खारफुटीसाठी संरक्षित अभयारण्य आहे. त्यामुळे एका बोगद्याद्वारे समुद्राखालून रेल्वे ट्रॅक तयार केले जातील. जेणेकरुन परिसंस्थेला कुठल्याही त्रास होणार नाही” असे बुलेट ट्रेन प्रोजेक्ट सांभाळणाऱ्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हटले आहे.

सर्वात लांब रेल्वे वाहतूक करणारा हा भारतातील पहिला अंडरसी (समुद्राखालील) बोगदा असेल. हा बोगदा १३.२ मीटर रुंदीची ट्विन ट्रॅक (अप-डाऊन दोन्ही मार्गांची) सिंगल ट्यूब असेल. हे बांधकाम आवश्यकतेनुसार न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) आणि टनेल बोरिंग मशीन (TBM) या दोन्ही पद्धतींनी केले जाईल. प्राधिकरणाने प्रकल्पासाठी पाण्याखालील सर्वेक्षण यापूर्वीच केलेले आहे.

Share This News

Related Post

मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला; शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे काळाच्या पडद्याआड

Posted by - August 14, 2022 0
मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात…
Medha Kulkarni

Medha Kulkarni : भाजप मेधा कुलकर्णीची नाराजी करणार दूर; उद्घाटनानंतर नितिन गडकरी त्यांची निवासस्थानी घेणार भेट

Posted by - August 12, 2023 0
पुणे : पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे.त्या चौकामध्ये प्रवाशांना अनेक वर्षांपासून वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत होते.त्या…

उस्मानाबाद येथे पोलिसांवर हल्ला तर शेगाव पोलीस ठाण्यावर जमावाचा हल्लाबोल

Posted by - February 7, 2022 0
उस्मानाबाद- पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच आता पोलिसांवर गावगुंडांनी हल्ला केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत.…
NCP

राज्याच्या राजकारणात किंगमेकर ठरलेल्या राष्ट्रवादीची ‘अशी’ झाली स्थापना

Posted by - June 10, 2023 0
10 जून 1999 राज्याच्या राजकारणातील मोठा दिवस याच एका राजकीय पक्षाचा उदय राजकीय पटलावर झाला हा राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्रवादी…

आमदार बच्चू कडूंना मोठा धक्का; चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्था निवडणुकीत प्रहारचे केवळ तीन उमेदवार विजयी

Posted by - March 21, 2023 0
चांदूरबाजार : 19 मार्चला चांदूरबाजार तालुका खरेदी विक्री संस्थेची निवडणूक पार पडली. १५ जागांच्या लढतीमध्ये निवडणुकीमध्ये प्रहारचे केवळ तीन उमेदवार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *