शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य; कर्नाटक न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

122 0

हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं दिला आहे.

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचे स्पष्ट करत मुस्लिम विद्यार्थीनींनी शाळा, कॉलेजमध्ये हिजाब घालण्यास परवानगी देण्याची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी आज कर्नाटकच्या काही जिल्ह्यांमध्ये १४४ कलम लागू करण्यात आला होता, जेणेकरून कोणतीही हिंसा उफाळून येऊ नये.

नेमका काय आहे हिजाब वाद ?

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला. उडुपी येथील कॉलेजमधील काही विद्यार्थींनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र त्यांना अडवण्यात आले. कॉलेज प्रशासनाने ड्रेसमध्ये समानता असावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. पण यावरून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाद वाढत गेला. याप्रकरणी विद्यार्थींनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या हिजाब वादाचे पडसाद संपूर्ण देशभरात यला मिळाले. काही शाळेत हिजाबच्या समर्थनार्थ आणि विरोध आंदोलन केले गेले. एवढेच नाही तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते.

Share This News

Related Post

Gautami And Father

आडनावावरुन सुरु असणाऱ्या वादावर गौतमी पाटीलच्या वडिलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - June 2, 2023 0
मुंबई : गौतमी पाटील (Gautami Patil) ही गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्या समोरील अडचणी काही थांबायच्या नाव…

दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे 2023 साठीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तारीख

Posted by - September 20, 2022 0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या मार्च 2023 साठीच्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात…
Satara News

Satara News : साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

Posted by - January 12, 2024 0
सातारा : साताऱ्याचे (Satara News) खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व सारंग पाटील यांच्या मातोश्री रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय 76)…

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार

Posted by - March 11, 2022 0
आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प…
Rahul Narvekar

Maharashtra Politics : न्यायालयाच्या नोटीसवर राहुल नार्वेकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - July 14, 2023 0
मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *