ऋतुजा लटकेंना उच्च न्यायालयाचा दिलासा : उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करा; मुंबई महापालिकेला आदेश

159 0

मुंबई : अंधेरी पोट निवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत लटके यांना राजीनामा स्वीकारल्याचे पत्र द्या असे आदेश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.

न्यायालयाच्या निकालामुळे ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी लटके उद्या ठाकरे गटातर्फे उमेदवारी अर्ज भरतील अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिकेने मंजूर न केल्यामुळे लटके यांना अंधेरी पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येत नव्हता. त्यामुळे मुंबई पालिके विरोधात ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती .

आज या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाकडे सुनावणी झाली ऋतुजा लटके यांच्यातर्फे ऍड. विश्वजीत सावंत तर मुंबई पालिकेतर्फे ऍड. अनिल साखरे यांनी बाजू मांडली आहे. त्यामुळे आता लटकेंचा निवडणुकीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Share This News

Related Post

Shinde Group MLA Fight

Shinde Group MLA Fight : शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा; शंभूराज देसाईंना करावी लागली मध्यस्थी

Posted by - March 1, 2024 0
मुंबई : विधीमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा (Shinde Group MLA Fight) झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे मंत्री…

PUNE CRIME : खडकी भागात दहशत माजवणाऱ्या टोळक्यावर मोक्का अंतर्गत कारवाई; आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 106 वी काम कारवाई

Posted by - November 7, 2022 0
पुणे : खडकी भागामध्ये दहशत माजवणाऱ्या टोळक्याविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगार सलमान नासिर शेख आणि त्याच्या…

ग्रामपंचायत निवडणूक निकाल : भोर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा दणदणीत विजय ; सरपंचपदासह दोन्ही ग्रामपंचायतींवर रोवला झेंडा ; थोपटेंना धक्का

Posted by - September 19, 2022 0
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये दोन्हीही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भोलावडे…

साधू वासवानी यांच्या 143 व्या वाढदिवसानिमित्त 56 व्या वार्षिक रथयात्रेचे आयोजन

Posted by - November 23, 2022 0
पुणे : २३ नोव्हेंबर २०२२ रोजी साधू वासवानी मिशनने साधू वासवानी यांचा १४३ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि करुणा आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *