दत्तजयंती निमित्त सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने

271 0

पुणे : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दत्त जन्म व दत्तजयंती निमित्त मिरवणूक सोहळा साजरा होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील अवजड वाहतूक ४ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पर्यायी रस्त्यावरुन वळविण्याचे आदेशीत केले आहे.

कापूरहोळ ते सासवड या मार्गावरील अवजड वाहने कापूरहोळ वरुन बंगळुरू- पुणे महामार्गावरील नवीन बोगद्यातून पुण्याकडे आणि सासवड ते कापूरहोळ या मार्गावरील अवजड वाहने सासवड वीर मार्गे सारोळा तसेच सासवड-दिवेघाट मार्ग कात्रज चौक अशी जातील.

श्रीक्षेत्र नारायणपूर येथे ५ ते ७ डिसेंबर २०२२ दरम्यान श्री दत्त सेवेकरी मंडळ यांचेवतीने दत्त जयंती सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तामिळनाडू, कनार्टक, राजस्थान या राज्यातूनदेखील भाविक दर्शनासाठी येत असतात. जवळच असलेल्या केतकावळे गावी असणारे बालाजी मंदीर या ठिकाणी देखील भाविक जात असतात. दोन्ही देवस्थानची ठिकाणे ही सासवड- कापूरहोळ या मार्गावर असून, यात्रा कालावधीत वाहतुकीचे नियमन व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यावरील अवजड वाहनांची वाहतुक वळविण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन (व्हिडिओ)

Posted by - January 27, 2022 0
पुणे- ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट (वय 78) यांचं पुण्यात राहत्या घरी निधन झालं. आज दुपारी त्यांच्या…

पॅराग्लायडींग हॉट बलून उड्डाणांना बंदी ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Posted by - March 5, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 6 मार्च रोजी पुणे शहरात दौरा होणार आहे. त्या अनुषंगाने व्हीव्हीआयपी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षिततेसाठी पुणे शहर…

मोठी बातमी : CBI च्या मागणीनंतर अनिल देशमुख यांच्या जामीनाला दहा दिवसांची स्थगिती

Posted by - December 12, 2022 0
मुंबई : भ्रष्टाचार प्रकरणी अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर…

CM EKNATH SHINDE : अभिनयातील बहुआयामी ‘विक्रम’ काळाच्या पडद्याआड !

Posted by - November 26, 2022 0
मुंबई : ‘भेदक नजर, भारदस्त आवाज आणि संयत अभिनयाने वैविध्यपूर्ण अशा भूमिकांचा नावाप्रमाणेच ‘विक्रम’ करणाऱ्या प्रतिभावंत महान अभिनेत्याचे निधन कला…

पाकिस्तान : कराचीमध्ये पोलीस मुख्यालयावर हल्ला; पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये अंदाधुंद गोळीबार, “पाकिस्तान दहशतवादाला मुळातून संपवेल..!”

Posted by - February 18, 2023 0
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातल्या पेशावरमध्ये एका मशिदीवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये 100 नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *