अतिवृष्टीतील मदत कार्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतर्क,यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश

117 0

मुंबई: राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ आणि एसडीआरएफच्या ४ अशा एकूण १३ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.            राज्यातील संपूर्ण कोकणसह अमरावती विभागातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी नदीच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. तसेच आवश्यक असणाऱ्या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.                आज दुपारी १२ वाजेपर्यंत कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०० मिमी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून हवामान विभागाकडून अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात मुंबई कुलाबा येथे ११७ मिमी तर सांताक्रूझ येथे १२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.                                                        रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील 2 नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे.व वाहतूक अन्य मार्गाने वळण्यात आली आहे.                                                      पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही, मात्र नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.                                                                      अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून गावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम सुरु असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक बचाव पथके कार्यरत आहेत.

Share This News

Related Post

फेसशिल्ड घालून चंद्रकांतदादा जत्रेत ! शाईफेक हल्ल्यापासून बचावासाठी लढवली अनोखी शक्कल !

Posted by - December 17, 2022 0
पिंपरी चिंचवड : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर पुन्हा शाईफेक हल्ला होऊ नये…

चित्रकला शिक्षकाने विद्यार्थिनीला मारला डायलॉग,”आपके पाव देखे, बहुत हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारीयेगा…”! विनयभंगाचा गुन्हा दाखल; आता शिक्षकाचे पाय तुरुंगात

Posted by - November 23, 2022 0
पुणे : पुण्यातील पाषाण भागातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. चित्रकला शिकवण्यासाठी घरी येणाऱ्या शिक्षकाने आपल्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा…
National Space Day

National Space Day : केंद्र सरकारची मोठी घोषणा; 23 ऑगस्ट ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ होणार साजरा

Posted by - October 15, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्रोच्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग करत भारताने एक नवा इतिहास (National Space Day) रचला.…

अक्षरधाम मेट्रो स्टेशनवरून उडी घेऊन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, CISF जवानांनी वाचवले प्राण (व्हिडिओ)

Posted by - April 14, 2022 0
नवी दिल्ली- दिल्लीच्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे CISF जवानांनी प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना मोबाइलमध्ये…
Accident

Accident : देवदर्शनाहून परत येताना काळाचा घाला; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

Posted by - June 25, 2023 0
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघाताचे (Accident) सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एकदा या महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *