हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आतापर्यंत ३३.०९ टक्के मतदान

1826 0

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आज शुक्रवारी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. दुपारपर्यंत ३३.०९ टकक्यांपर्यंत मतदान झाले आहे.

निवडणुकीत एकूण ५७ उमेदवार रिंगणात असून १७ हजार ७४६ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. ४ मतदान केंद्रातील ३१ मतदान बुथवर मतदान प्रक्रिया सुरु आहे. वीस वर्षांनंतर ही निवडणूक लागल्याने या निवडणुकीला खूप महत्त्व आले आहे. या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत, आडते -व्यापारी, हमाल मापारी या चार गटातील उमेदवार रिंगणात आहेत.

सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी आणि राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार या दोन पॅनलमध्ये लढत होत आहे. व्यापारी आडते मतदार संघातून २ जागेसाठी सर्वाधिक मतदार आहेत . यामध्ये १२ उमेदवार रिंगणात उतरले असून जय शारदा गणेश पॅनल व जनशक्ती पॅनल व व्यापारी विकास पॅनल यामध्ये खरी लढत आहे. तर तर हमाल मापाडी या संघातून एक जागेसाठी ५ जण रिंगणात आहेत. यामध्येही चुरस सुरू आहे.

मतदान केंद्रावर मतदारांची एकच गर्दी झाली आहे. यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारपर्यंत दोन तासात १३ टकक्यांपर्यंत मतदान झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी सांगितले.

Share This News

Related Post

Bhau Rangari Ganpati

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा हेरीटेज वॉकमध्ये समावेश; पुणे महापालिकेची घोषणा

Posted by - July 8, 2023 0
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati) पुणे महापालिकेकडून ‘ऐतिहासिक वारसा स्थळ’…

BIG NEWS : विनयभंग केसमध्ये ठाण्याच्या न्यायालयाचा मोठा निर्णय; जितेंद्र आव्हाड यांना..

Posted by - November 15, 2022 0
मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा…
Pune News

Pune News : …तो शो ठरला अखेरचा ! थिएटरमधून बाहेर पडताच 8 ते 10 जणांच्या टोळक्यांकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - August 16, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Pune News) पूर्ववैमनस्याच्या वादातून 8 ते 10 जणांच्या…

महाराष्ट्र कृषी दिवस का साजरा केला जातो आणि त्याचे महत्व काय आहे जाणून घ्या….

Posted by - July 1, 2022 0
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो .बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह हा ‘शेती ‘वरती अवलंबून आहे .महाराष्ट्रात तर शेती हा व्यवसाय…
Manoj Jarange

Manoj Jarange : अखेर भगवं वादळं मुंबईत धडकणार ! सरकारच्या शिष्टमंडाळासोबतची बैठक निष्फळ

Posted by - January 25, 2024 0
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची (Manoj Jarange) राज्य सरकारच्या शिष्टमंडाळासोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. मनोज जरांगे हे मुंबईत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *