Hasan Mushrif

हसन मुश्रीफ यांना मुंबई न्यायालयाचा दणका ! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

600 0

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यामागे सध्या सध्या ईडीचा ससेमिरा लागला आहे. मुश्रीफ यांनी अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी मुंबई सेशन्स कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाने मुश्रीफ यांचा अर्ज फेटाळला आहे.

हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरी ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा छापेमारी केली. या छापोमारीतून ईडी अधिकारी त्यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ईडी अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण मुश्रीफांनी सुरवातीला चौकशीला जाणं टाळलं होतं. त्याऐवजी त्यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी कोर्टाचे दार ठोठावले. याप्रकरणी कोर्टाने त्यांना काही दिवसांसाठी दिलासा दिला. त्यानंतर हसन मुश्रीफ ईडी चौकशीला सामोरे गेले.

त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या प्रकरणात आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी मुंबई स्तर न्यायालयात अर्ज केला होता. हसन मुश्रीफ यांच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवादही करण्यात आला होता. मुश्रीफांच्या जामीन अर्जावर दोन आठवड्यांपूर्वीच युक्तिवाद पूर्ण झाला होता.

कोर्टाने याबाबतचा निकाल राखीव ठेवला होता. मुश्रीफ यांना जायामिन मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. कोर्टाने ज्या तारखेला निकाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं त्यादिवशीही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आज अखेर हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. आता हसन मुश्रीफ मुंबई हायकोर्टात जातात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News

Related Post

PMPML कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनात वाढ होणार – प्रमोद (नाना) भानगिरे

Posted by - December 26, 2022 0
पुणे : PMPML चे कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. महापालिकेच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार डिसेंबर महिन्याच्या वेतनात…

ईडीच्या कारवाईबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली, म्हणाले, ” गां XX दम असेल तर…

Posted by - May 21, 2022 0
अमरावती – राज्यात सध्या अनेक नेत्यांच्या विरोधात ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईवरून भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये…
Kuldeep Konde

Kuldeep Konde : कुलदीप कोंडे यांनी दिला शिवसेना पक्षपदाचा राजीनामा

Posted by - October 30, 2023 0
नसरापूर : मराठा समाज आरक्षण व सर्वसामान्य समाजाप्रती आदर राखत असल्याचे पवित्रा घेत उध्दव ठाकरे गटाचे शिवसेना पक्षाचे पुणे जिल्हा…
Pandharpur Temple

Pandharpur News : कार्तिकी एकादशीला कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना पुजेचा मान नाही, विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय

Posted by - November 8, 2023 0
पंढरपूर : कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या शासकीय महापुजेचा मान कोणाला द्यायचा यावर पेच निर्माण झाला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल…

‘प्रवीण मसालेवाले’चे संस्थापक ज्येष्ठ उद्योजक हुकमीचंद चोरडिया यांचं निधन

Posted by - June 3, 2022 0
पुणे- ‘प्रवीण मसालेवाले’ या लोकप्रिय ब्रँडचे संस्थापक सुप्रसिद्ध उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया (वय ९२) यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *