#SAMBHAJINAGAR CRIME : हुंड्यासाठी सात महिन्याच्या गर्भवतीचा छळ; दोन निष्पाप जीवांची गळफास घेऊन आत्महत्या

711 0

संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये विवाहितेने सासरकडच्यांकडून होणाऱ्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही विवाहिता सात महिने गर्भवती देखील होती. त्यामुळे आईसह पोटातल्या निष्पाप बाळाला देखील हुंडाबळीचा शिकार व्हावे लागले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सासरकडच्या मंडळींच्या छळाला कंटाळून सात महिन्यांची गर्भवती असलेल्या सहाय्यक प्राध्यापिकांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गारखेडा परिसरातील गजानन कॉलनीमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी वर्षा दीपक नागलोत हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या तिच्या सासरकडच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये पती दीपक नगलोत सासरा राजाराम नगलोत, सासू देविका नगलोत आणि नणंद वैशाली जरवाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहेरच्या लोकांनी लग्नामध्ये बारा लाखाचा हुंडा दिला होता तर सासरकडच्यांनी 15 लाखाची मागणी केली होती. त्यामुळे या विवाहित गर्भवती महिलेची सासरकडच्यांकडून सातत्याने छळवणूक होत होती. त्यामुळेच या दुर्दैवी मातेने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.

Share This News

Related Post

Dhule Suicide

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

Posted by - June 1, 2023 0
धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जवखेडा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नुकतीच पोलीस भरतीची परीक्षा दिलेल्या…
Advay Hire

Advay Hire : ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना अटक; कोण आहेत अद्वय हिरे?

Posted by - November 16, 2023 0
नाशिक : सध्या नाशिक जिल्ह्यात जिल्हा बँक फसवणूक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट…

अखंड भारत तयार करण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकणार नाही, मोहन भागवत यांचे वक्तव्य

Posted by - April 14, 2022 0
हरिद्वार- पुढील 15 वर्षात अखंड हिंदुस्तान होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन…

राजगडावर रात्रीच्या मुक्कामास बंदी; राजगडाचे पावित्र्य भंग करणाऱ्या पर्यटकांवर होणार दंडात्मक कारवाई

Posted by - February 15, 2023 0
राजगड : राजगड किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पर्यटक मुक्कामी राहत असल्याने तिथेच जेवण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *