गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिसांची नोटीस… सदावर्ते म्हणाले.. ‘घाबरणार नाही, लढणार’

300 0

मुंबई- मुंबई पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्तेंना पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे. त्यामुळे गावदेवी पोलिसांनी आज त्याची चौकशी केली. गावदेवी पोलिसांनी सदावर्ते यांना ११० अंतर्गत नोटीस देखील पाठवली आहे. ही नोटीस राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा सदावर्तेंच्या वकिलांनी केला आहे. याच नोटीसीनंतर सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“ही नोटीस म्हणजे, सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं द्योतक आहे. आम्हाला घटनेने दिलेलं स्वातंत्र्य आणि संविधानिक हक्क सरकार अशा प्रकारे हिरावून घेऊ शकत नाही. आमच्या हक्काला तुम्ही पायदळी तुडवू शकत नाही. त्यामुळे कायदेशीर बाबींना आम्ही डंके की चोट पर उत्तर देऊ. पोलिसांच्या कारवाईला आम्ही कधीच घाबरलो नाही, इथून पुढेही घाबरणार नाही” अशी आक्रमक प्रतिक्रिया सदावर्ते यांनी दिली. ‘सत्तेचा कितीही दुरुपयोग करा, जय श्रीराम म्हणणारे आणि जय भीम म्हणणारे आम्ही तुम्हाला घाबरणार नाही. डंके की चोट पर उत्तर देऊ’, असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला.

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ या संघटनेची स्थापना केली आहे. या माध्यमातून ते एसटी बँकेची निवडणूक लढवणार आहेत. तसेच यापुढे राज्यातील प्रत्येक निवडणूक आपण लढणार असल्याचं त्यांनी घोषित केलं आहे.

अॅड. गुणरत्न सदावर्ते अयोध्येला जाणार

अॅड. गुणरत्न सदावर्तेही अयोध्येचा दौरा करणार आहेत. आपण राम जन्मभूमीच्या केसमध्ये वकील होतो, त्यामुळे आपल्याला अयोध्येतून बोलावणं आलं आहे असं सांगत आपण लवकरच अयोध्येला जाणार आहे असं अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी जाहीर केलं आहे. त्यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांच्यासोबत या महिन्याच्या अखेरपर्यंत अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Share This News

Related Post

मालवाहू ट्रकला अपघात; अग्निशमन दलाकडून दोघांची सुटका

Posted by - March 5, 2023 0
पुणे:  अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मुंबई-बेंगलोर हाइवे, सुस खिंड, महिंद्रा शोरूम समोर दोन मालवाहू ट्रकचा अपघात झाला असून त्यामधे दोन…
Sharad-Pawar-vs-Ajit-Pawar

Sharad Pawar : अजितदादांचे गौप्यस्फोट खरे की खोटे? शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

Posted by - December 2, 2023 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जतमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवारांबाबत (Sharad Pawar) गौप्यस्फोट केले. अजित पवारांच्या या…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका

Posted by - November 23, 2022 0
पुणे : शहरात गेली पाच वर्षे सुरू असलेली, समान पाणीपुरवठा, उड्डाण पूल, रस्ते, पीएमपी बसेस खरेदी, आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण आदी…

पुण्यात जनता वसाहतीजवळ कॅनॉलमध्ये कोसळली रिक्षा, एकजण गेला वाहून (व्हिडिओ)

Posted by - January 31, 2022 0
पुणे- पुण्यातील पर्वतीपायथ्याला असलेल्या जनता वसाहतीजवळ एक ऑटोरिक्षा कॅनॉलमध्ये पडल्याची घटना रविवारी रात्री 8 च्या सुमारास घडली आहे. या घटनेत…

श्री शंकर महाराज समाधीस्थळी प्रकटदिन सोहळ्या निमित्त लोटला लाखो भक्तांचा जनसागर VIDEO

Posted by - November 1, 2022 0
धनकवडी : पुणे सातारा रस्त्यावरील धनकवडी येथील श्री.शंकर महाराज समाधी स्थळी प्रकट दिन सोहळ्यानिमित्त पहाटे चार वाजल्यापासून भक्तांच्या लांबच्या लांब…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *