वकील गुणरत्न सदावर्ते यांनी स्थापन केली संघटना; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

371 0

मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवी संघटना स्थापन केली असून या संघटनेचे एसटी कर्मचारी जनसंघ असं नाव देण्यात आलं आहे. या संघटनेच्या माध्यमातून एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत ते स्वत:चं पॅनेल उभा करणार असल्याची माहिती आहे. या संघटनेच्या माध्यमातून एसटी विलीनीकरणाचा लढा पुढे चालू ठेवणार असल्याचा इशारा देखील सदावर्ते यांनी दिला आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना नंतर इतर जुन्या गुन्ह्यांतही अटक करण्यात आली. त्यामुळे सदावर्ते हे तब्बल १८ दिवस तुरुंगात होते. अखेर कोर्टाने जामीन मंजूर केल्याने तुरुंगातून बाहेर पडलेल्या सदावर्ते यांनी आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं, अशी मागणी करत संप पुकारला. या संपातही सदावर्तेंनी उडी घेत आंदोलनाचं नेतृत्व केलं. या आंदोलनादरम्यान सदावर्तेंनी केलेली विविध वक्तव्ये चर्चेचा विषय ठरली. विलीनीकरणाची आशा मावळल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आक्रमक आंदोलन केलं. या हिंसक आंदोलनाचा कट वकील सदावर्ते यांनीच रचल्याचं सांगत पोलिसांकडून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.

Share This News

Related Post

#MUMBAI : मोलकरणीच्या जीवावर घर सोडून जाताय ? मुंबईतील ही घटना वाचाच ! मालकिणीला लुटले 7 लाखाला

Posted by - March 1, 2023 0
मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कांदिवली पोलिसांनी या भामट्या मोलकराणीला गजाआड केले आहे. दीपिका पवार असं…

‘रिपाइं’ प्रदेश कार्यकारिणीत ॲड. मंदार जोशी यांची निवड

Posted by - October 1, 2022 0
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्यपदी ॲड. मंदार जोशी यांची निवड झाली आहे. ‘रिपाइं’चे…

पुण्यात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का! शर्मिला येवले यांचा युवासेना सहसचिव पदाचा राजीनामा

Posted by - November 19, 2022 0
पुणे : पुण्यात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शर्मिला येवले यांनी युवासेना सहसचिव पदाचा राजीनामा दिला आहे.…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी

Posted by - December 4, 2022 0
देवेंद्र फडणवीसांचा महत्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या समृध्दी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आहे.मात्र, त्यापूर्वी आज (रविवार 4डिसेंबर)…

महत्वाची माहिती : बेरोजगारांना केंद्र सरकार महिन्याला देणार 6 हजार रुपये? केंद्राने दिले हे स्पष्टीकरण

Posted by - October 29, 2022 0
नवी दिल्ली : सध्या लॉकडाऊननंतर भारतामध्ये बेरोजगीचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाकाळात देखील अनेक तरुणाच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशात आता सायबर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *