महत्वाची बातमी ! गुणरत्न सदावर्ते यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

491 0

सातारा सत्र न्यायालयाने आज 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी तसेच कोल्हापूर आणि सोलापूरच्या छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते हे सातारा पोलिसांच्या अटकेत आहेत.  

सातारा पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्तें यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. ती नामंजूर करुन सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  त्यांना आता मुंबईला आणण्यात येणार असून ऑर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे.

दरम्यान, डॉ. जयश्री पाटील यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. अॅड. जयश्री पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल असून त्या अद्याप न्यायालयासमोर आल्या नाहीत.  अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात आणले जात असताना त्या वेळेला त्यांनी चक्क खा. उदयनराजे यांची कॉलर उडवण्याची स्टाईल मारत न्यायालयात प्रवेश केला. गुणरत्न सदावर्ते यांची ही स्टाईल पाहून अनेकजण अवाक झाले.

Share This News

Related Post

संभाजीनगरमध्ये सरपंचाने नोटा उधळत केले शेतकऱ्यांसाठी अनोखे आंदोलन

Posted by - March 31, 2023 0
आंदोलन करण्यासाठी कोण काय आयडिया लढवेल हे काही सांगता येत नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा येथील अपक्ष सरपंच मंगेश…

गोरखनाथ मंदिर हल्लेखोराचे आयएस कनेक्शन असल्याचा एटीएसला संशय

Posted by - April 5, 2022 0
लखनौ – उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिर परिसरात रविवारी सुरक्षा रक्षकांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. हा हल्ला करणाऱ्या मुर्तजा…

पिंपरी- चिंचवडमध्ये H3N2 व्हायरसचा पहिला मृत्यू ! घाबरू नका पण काळजी घ्या !

Posted by - March 16, 2023 0
Edited By : बागेश्री पारनेकर : पिंपरी चिंचवड शहरात H3 N2 व्हायरसचा पहिला मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये एका…

अनिल देशमुख, सचिन वाझे यांच्यासह देशमुखांचे दोन सचिव सीबीआयच्या ताब्यात

Posted by - April 4, 2022 0
मुंबई- मनी लॉन्ड्रिग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख , त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे…

ध्वनी मर्यादेच्या नियमांचे पालन करा ; अन्यथा गुन्हे दाखल करणार – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

Posted by - September 8, 2022 0
पुणे : कोरोनामुळे दोन वर्ष गणेशोत्सव मनासारखा साजरा करता आला नाही. आता कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसताना पुणेकर गणेशोत्सव अत्यंत उत्साहात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *