पालकमंत्र्यांची भिडे वाडा येथील राष्ट्रीय स्मारकाबाबत पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरेंसोबत सकारात्मक चर्चा

605 0

पुणे : भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासोबत चर्चा केली. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणे ही लोकभावना असल्याने हे स्मारक होणारच, असा विश्वास श्री.पाटील यांनी बैठकीनंतर व्यक्त केला. बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन, स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही विजय ढेरे यांनी दिली.

भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी पालकमंत्री पाटील हे आग्रही आहेत. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी भिडे वाड्यासंदर्भातील शासनाच्या भूमिकेसंदर्भात महाधिवक्त्यांना अवगत केले होते. तसेच, उच्च न्यायालयात यासंदर्भात शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंतीही पालकमंत्र्यांनी महाधिवक्त्यांना केली होती.

त्यानंतर त्यांनी भिडे वाड्यासंदर्भातील वाद लवकर निकाली निघावा यासाठी मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासमवेत पुण्यातील निवासस्थानी बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तेथे राष्ट्रीय स्मारक होणे महत्वाचे आहे. हे स्मारक राज्यातील नव्हे तर देशातील महिलांचे प्रेरणास्थान ठरणार असल्याने पुना मर्चंट बॅंकेने सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. पालकमंत्र्यांच्या आवाहनास ढेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, बॅंकेचे सर्व सभासद आणि भाडेकरू यांच्याशी चर्चा करून सहकार्याची भूमिका घेण्याबाबत आश्वस्त केले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी राजेंद्र मुठे उपस्थित होते.

Share This News

Related Post

garder callopesd

पुण्यातील वाकडेवाडीत 27 टन मेट्रोचा गर्डर कोसळला; परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Posted by - May 8, 2023 0
पुणे : पुण्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या वाकडेवाडी परिसरात आज सकाळी 27 टन मेट्रोचा गर्डर कोसळला आहे. यामुळे त्या ठिकाणी असलेल्या…
Pune News

Pune News : धक्कादायक ! थर्टी फस्टची पार्टी बेतली जीवावर; इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 1, 2024 0
पुणे : सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण (Pune News) पाहायला मिळत आहे. मात्र या उत्सवाला…

मंत्रिमंडळ बैठक : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

Posted by - September 12, 2022 0
राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्यासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या…

पंतप्रधान मोदी माफी मागा ; पुण्यात काँग्रेसचं आंदोलन (व्हिडिओ)

Posted by - February 18, 2022 0
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने कोरोना देशात पसरविला असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ…

पुणे महानगरपालिका निवडणूक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत व्हाव्यात ; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल – प्रशांत जगताप

Posted by - August 12, 2022 0
पुणे : मार्च २०२२ मध्ये होऊ शकत असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे, याकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या लढाईसाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *