पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची पवनाथडी यात्रेला भेट; समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक-पालकमंत्री

259 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर आयोजित पवनाथडी यात्रेला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली आणि सहभागी बचत गटांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार उमा खापरे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी महापौर माई ढोरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, महिला स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत समाजाच्या प्रगतीला मर्यादा आहेत. महिला बचत गटांना प्रशिक्षण आणि बाजार उपलब्ध करून दिल्यास ते अधिक सक्षमपणे काम करतील. बचत गटांनी नागरिकांची गरज ओळखून नवे उत्पादन आणि सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. बचतगटांना असे नवे प्रयोग करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असेही श्री.पाटील म्हणाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पवनाथडी यात्रेच्या माध्यमातून ४०० बचत गटांना चांगली संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगून अशा उपक्रमाद्वारे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती मिळेल असे पालकमंत्री म्हणाले.

पवनाथडी यात्रेविषयी…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाकडील महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचतगट, वैयक्तिक महिला यांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात या हेतूने गवनाथडी जत्रेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.

महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या चटण्या, पापड, लोणची, जाम, जेली, विविध प्रकारचे मसाले, विविध गृहोपयोगी उत्पादने, दैनंदिन वापराच्या वस्तु, हस्तकला निर्मित उत्पादने यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचा समावेश विक्री स्टॉलमध्ये आहे. खवैय्यांना महिलांनी तयार केलेले चुलीवरचे वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, शाकाहारी मासवडी, खानदेशी पुरणाचे मांडे, झणझणीत चुलीवरचं मटण, खेकडा करी, कोंबडी वडे, दमबिर्याणी, कुरकुरीत मच्छी फ्राय अशा मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

जत्रेमध्ये नागरिकांच्या मनोरंजनासाठी रोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पवनाथडी जत्रेत एकूण ४०० इतकी स्टॉल आहेत, तर ५६० बचगटांनी यात्रेत सहभाग घेतला आहे. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीचे २४६ स्टॉल, महाराष्ट्रीयन मराठमोळ्या शाकाहारी पदार्थाचे १७७ स्टॉल, तर मांसाहारी पदार्थाचे १३७ स्टॉल यात्रेत आहेत.

Share This News

Related Post

पुणे : विजय दिवसाच्या स्मरणार्थ ‘सदर्न कमांड विजय रन’ चे आयोजन

Posted by - December 17, 2022 0
पुणे : 1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त, सात राज्यांमध्ये पसरलेल्या भारतीय सैन्याच्या सदर्न कमांड…

पुणे : आज पहाटे 4 ते दुपारी 4 पर्यंत गेल्या 12 तासात पुणे अग्निशमन दलाची कामगिरी

Posted by - November 17, 2022 0
पुणे : आज दिवसभरामध्ये पुण्यामध्ये अनेक ठिकाणी आगीच्या भीषण घटनांपासून किरकोळ घटना घडल्या आहेत तर भगवे वाडी मध्ये एका इमारतीमध्ये…

ASHISH SHELAR : भाजप-शिवसेनेमध्ये शाब्दिक टोलवाटोलवी ; “आमच्या कमळाला ‘बाई’ म्हणत हिणवता , आम्ही तुम्हाला ‘पेंग्विन सेना’ म्हणायचं का ? “

Posted by - September 3, 2022 0
मुंबई : सध्या राजकारणामध्ये वैयक्तिक आयुष्य , राजकारणातील निर्णय , पक्षाचे नाव , राजकीय नेत्याचे नाव आणि अशा कित्येक गोष्टींवरून…

अमरावतीत पालिका आयुक्तांच्या अंगावर दोन महिलांनी फेकली शाई

Posted by - February 9, 2022 0
अमरावती- अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर…

युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय मायदेशी सुखरूप परतले

Posted by - February 24, 2022 0
नवी दिल्ली- रशिया युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. अशा युद्ध परिस्थितीमध्ये युक्रेनमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकलेले आहेत. त्यामुळे या नागरिकांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *