गिरवली बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विचारपूस

280 0

पुणे : आंबेगाव तालुक्यात गिरवली येथील बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. जखमी विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार करण्याच्या व आवश्यक सर्व आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना यावेळी श्री. पाटील यांनी डॉक्टरांना‌ केल्या.

साईनाथ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा हात मायेने फिरला…घाबरू नको, लवकर बरी हो म्हणत हातातले चॉकलेट विद्यार्थीनीच्या हातात दिले….आणि काही क्षण आपल्या वेदना विसरून तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं…शाळेने दिलेले संस्कार न विसरता तिने याही स्थितीत ‘थँक यू’ म्हटलं… जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हे हास्य आणि त्यांचे दोन शब्द सुखावून गेले..

आयुकाची दुर्बिण पाहण्यासाठी गेलेल्या पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेच्या बसचा मंगळवारी अपघात झाला. दुर्घटनेत किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना उपचारांती पालकांकडे सोपविण्यात आले होते. पाच विद्यार्थी आणि चालकावर भोसरी येथील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालकमंत्री पाटील यांनी जखमी विद्यार्थीनी आणि चालकाची भेट घेऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. जखमींवर चांगले उपचार करण्याबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार द्यावेत असे त्यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांना भेटणार असल्याने त्यांनी सोबत ‘खावू’देखील नेला होता. त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रेमळपणे संवाद साधतांना त्यांना धीर दिला आणि सोबत चॉकलेटही दिले. ती आवडीची भेट पाहून क्षणभर त्या विद्यार्थीनीही आपल्या वेदना विसरल्या. पालकमंत्र्यांनी मुलींच्या पालकांशीही चर्चा करून मुले लवकर बरे होतील, त्यांच्यावर चांगले उपचार होतील, चिंता करू नका अशा शब्दात त्यांना धीर दिला. त्यांची ही भेट जखमी विद्यार्थींनींसाठी सुखद आणि धीर देणारी ठरली.

यावेळी साईनाथ रुग्णालयाचे संचालक डॉ.सुहास कांबळे, गणेश भेगडे, अमोल थोरात नामदेव ढाके, सदाशिव खाडे, ताराचंद कराळे आदी उपस्थित होते.

Share This News

Related Post

“राहुल गांधी को मैने बोहोत सालो पहले छोड़ दिया है…!”; असे का म्हणाले राहुल गांधी, वाचा सविस्तर

Posted by - November 29, 2022 0
मध्य प्रदेश : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रात वादंग उभे राहिले होते. सध्या राहुल गांधी यांची हि यात्रा…

‘त्या’ विधानाप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार

Posted by - May 27, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यातील काही वकील…
Punit Balan

Punit Balan : काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार युवा उद्योजक पुनीत बालन यांची घोषणा

Posted by - May 29, 2024 0
पुणे : लष्कराच्या सहकार्याने काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला असून महाराजांच्या या पुतळ्याकडे बघून जवानांना प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे स्वराज्यरक्षक…

#PUNE : ज्ञान तीर्थक्षेत्र आळंदी-देहू ते विद्वतनगरी काशी-वाराणसी जगाच्या नकाशावर भारत ‘विश्वगुरू’ची उद्घोषणा

Posted by - February 21, 2023 0
पुणे : भारताचे द्रष्टे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैश्विक संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या नॉलेज कॉरिडॉरमधून ‘भारत विश्वगुरू’ या संकल्पनेची उद्घोषणा ९…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इनडोअर हॉल आणि सिंथेटीक ट्रॅकचे उद्घाटन

Posted by - June 5, 2022 0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *