आमदार गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ‘ही’ मागणी

232 0

सांगली – भाजपचे आमदार पडळकर यांनी अहमदनगरच्या नामांतरासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. अहमदनगरचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे.

या पत्रात पडळकर यांनी म्हटले आहे की, अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखण्यात आलं. मुंबई बॅाम्ब ब्लास्टमध्ये शेकडो हिंदूचे जीव गेले. या बॅाम्ब ब्लास्टचा सुत्रधार दाऊद इब्राहीम याच्या बहिणीसोबत मंत्री नवाब मलिक यांनी आर्थिक भागीदारी केली. मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये मुघलशाही पद्धतीने पोलीस बळाचा गैरवापर केला. हिंदू राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती म्हणजे पवार यांच्या नातवाला लॅान्च करण्याचा इव्हेंट त्यांना वाटतो.

हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत जेव्हा हिंदू संस्कृती, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती. त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी यांनी या हिंदू संस्कृतीत प्राण फुकले. त्यांचा जीर्णोद्धार केला. म्हणून तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’चे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नाही. स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा आणि होळकरशाहीचा सम्मान कराल अशी अपेक्षा आहे. बहुजन समाज जागा झाला आहे आणि संघटीत झालाय, हे ध्यानात ठेवा, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात दिला आहे.

 

Share This News

Related Post

Buldhana Bus Accident

Buldhana Bus Accident: ‘समृद्धी’वरील अपघात प्रकरणी आली मोठी अपडेट; बसचालकाविरोधात ‘या’ कलमांतर्गत दाखल केला गुन्हा

Posted by - July 1, 2023 0
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ (Buldhana Bus Accident) आज सकाळी बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 25…

सणासुदीच्या दिवसात एसटी कर्मचाऱ्यांवर येणार आर्थिक संकट ? राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे एसटी महामंडळासमोर मोठे आव्हान

Posted by - September 19, 2022 0
महाराष्ट्र : पुढच्या महिन्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कसा करायचा हा पेचाचा प्रश्न एसटी महामंडळासमोर उभा ठाकला आहे. सरकारकडून एसटी महामंडळास…
Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! दांडिया खेळताना झालेल्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

Posted by - October 24, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दांडिया खेळताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली…
Nitin Bhosale

Nashik News : नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का ! माजी आमदार नितीन भोसलेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

Posted by - September 11, 2023 0
नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Nashik News) सर्वच पक्षांतील नाराजी नाट्य आता समोर येऊ लागले आहेत. शिवसेना आणि…

पुणे : पतित पावन संघटनेचे सावरकरांच्या विरोधात विधान केल्याच्या निषेधार्थ राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोड़े मारून निदर्शन

Posted by - November 17, 2022 0
पुणे : पतित पावन संघटना पुणे शहर कर्वे रस्त्यावरिल स्वातंत्र्यवीर स्मारका बाहेर स्वा. सावरकर ह्यांच्या विरोधात विधान करणाऱ्या खासदार राहुल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *