‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

292 0

पुणे : ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वय राखत ‘जी -२०’ परिषदेचे आयोजन यशस्वी करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

‘जी -२०’ परिषदेच्या तयारीबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षक्षतेखाली हॉटेल जे. डब्ल्‌यू मेरियट येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

‘जी -२०’ परिषदेच्या निमित्ताने प्रतिनिधींच्या स्वागतासाठी तसेच शहर सौंदर्यीकरण आणि अनुषंगिक विकासकामांची तयारी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली झाली आहे अशा शब्दात प्रारंभी पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रशासनाचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, ३७ देशातील १५० हून अधिक प्रतिनिधी या परिषदेसाठी येणार असल्याने सुरक्षाविषयक तसेच शिष्टाचारासंबंधी सर्व काळजी घ्यावी. पुणे, महाराष्ट्राची औद्योगिक क्षमता, गुंतवणूकीची क्षमता संपूर्ण क्षमतेने प्रदर्शित करावी, असेही ते म्हणाले.

यावेळी विभागीय आयुक्त श्री. राव यांनी बैठकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीबाबत संगणकीय सादरीकरण केले. या बैठकीसाठी भारत सरकारच्या निर्देशानुसार व समन्वयातून आवश्यक बाबींचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्यावतीने शहर सुशोभिकरणाचे काम कल्पकपणे करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पाहुण्यांचे स्वागत, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, बैठकीनिमित्त देण्यात येणारी प्रतिकात्मक भेटवस्तू, स्मृतीचिन्हे, लावण्यात येणारे प्रदर्शन स्टॉल, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरुपाची भोजनव्यवस्था, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या निमित्ताने भरडधान्याचे वैशिष्टपूर्ण खाद्यपदार्थ आदींबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

‘जी -२०’ बैठक स्थळाशेजारी ५ प्रदर्शन दालने लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुणे महाननगरपालिकेकडून शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात सुरु असलेल्या कामांची माहिती असणारे दालन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराट्र आद्योगिक विकास महामंडळाचे महाराष्ट्र व पुण्याची औद्योगिक क्षमता प्रदर्शित करणारे दालन, भारतीय जनजातीय सहकारी विपनन विकास महासंघ (ट्रायफेड) आणि महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योगची उत्पादनांचा समावेश असलेले दालन तसेच महिला व बचत गटाची उत्पादने आणि सामाजिक वनीकरणांतर्गत बांबूपासून बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री दालन उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पुणे विद्यापीठात १६ जानेवारी रोजी या पाहुण्यांच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुणेरी ढोल पथक, महाराष्ट्राचे मर्दानी खेळ, लावणी जुगलबंदी, शिववंदना, गणेशस्तुती तसेच गोंधळ आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

Share This News

Related Post

Dagdushet Ganpati

Pune Ganpati : इतिहासात पहिल्यांदाच अनंत चतुर्दशीदिवशी झाले दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

Posted by - September 28, 2023 0
पुणे : जय गणेश… गणपती बाप्पा मोरया… पुण्याचा अधिपती दगडूशेठ गणपती… च्या जयघोषात गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी 4 वाजता…
Chandrapur Accsident

भावाच्या अ‍ॅडमिशनसाठी जाताना बहिणीचा वाटेत दुर्दैवी मृत्यू; बापाच्या डोळ्यादेखत सोडला जीव

Posted by - June 18, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये भावाच्या अ‍ॅडमिशनसाठी जाताना बहिणीचा वाटेत मृत्यू झाला आहे. बल्लारपूर…
Aadhar

Aadhar Update : आधार फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ

Posted by - September 8, 2023 0
भारतीय नागरिकांना केंद्र सरकारकडून (Aadhar Update) आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आधार कार्डवरील तपशीलात विनामूल्य बदल करण्याची मुदत तीन महिन्यांनी…
MIT Pune

MIT : एमआयटी तर्फे घेण्यात आला सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

Posted by - December 26, 2023 0
पुणे : “शाळा ही ज्ञान मंदिर असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रोज नवनवीन गोष्टी शिकणे, नीटनेटकेपणा अंगीकारणे, वक्तशिरपणा आणि देश प्रेम असावे.…

#कौतुकास्पद : आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बनवली दिव्यांग बांधवांसाठी खास ब्लाइंड स्टिक, कसा होणार फायदा पहा

Posted by - March 25, 2023 0
नाशिक : इगतपुरी शहरातील महात्मा गांधी हायस्कूल येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ विद्यार्थ्यांनी दिव्यांग बांधवांना उपयुक्त ठरेल अशी ब्लाइंड स्टिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *