पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर! 5 लाखांपर्यंत आरोग्य सेवा मिळणार मोफत… कसे ? वाचा सविस्तर

3784 0

पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड असलेल्या नागरिकांसाठी एक खुश खबर आहे.‌ या रेशन कार्ड धारकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता येणार आहे. देशात आत्तापर्यंत केशरी आणि पिवळा रंगाचे रेशन कार्ड धारकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळत होता मात्र आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

या दोन्ही योजना रुग्णांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत.‌ त्यामुळेच या योजनेमध्ये पांढरे रेशन कार्ड धारकांचा समावेश व्हावा यासाठी सरकारने फेरविचार केला आणि आता ही योजना पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनाही लागू होईल या संदर्भातला शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे.‌ पांढऱ्या रेशनकार्ड धारकांनासुद्धा ५ लाखांपर्यत मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.

आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य

या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डधारकांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करून घ्यावे लागणार आहे. यासाठी पांढरे रेशन कार्ड आधारकार्डला जोडण्याची मोहीम राबवावी, अशी सूचना अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी रेशन कार्डधारकांनी सुद्धा पुढाकार घेऊन त्यांचे रेशनकार्ड आणि आधार कार्डशी लिंक करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

अर्थकारण : मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करताना दमछाक होतेय ? हा लेख वाचा, मदत मिळेल

Posted by - January 27, 2023 0
अर्थकारण : मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करताना मुलांच्या आवडीनिवडी जाणून घेऊन त्या शाखेतील शिक्षणाचा सध्याचा खर्च किती आहे, हे पाहावे…
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबादचे झाले छत्रपती संभाजीनगर; नामकरण फलकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Posted by - September 16, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू

Posted by - October 22, 2022 0
पुणे:दीपावलीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पुण्यातून दानापूरला जाणाऱ्या रेल्वे मध्ये चढताना प्रवाशांच्या चेंगरा…
Whats App

Whatspp ने सुरु केले ‘हे’ नवीन फीचर्स; सेंड केलेला मेसेज करता येणार एडिट

Posted by - May 15, 2023 0
पुणे : आताच्या काळात जवळपास सगळेच जण व्हाट्सअ‍ॅप (Whatsapp) वापरतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या व्हाट्सअ‍ॅपचा वापर आपण एकमेकांना संदेश पाठवणे,…

पुणे : जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

Posted by - December 30, 2022 0
पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात असून पोलीस आयुक्त रितेश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *