क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! पुण्यात रंगणार भारत-श्रीलंका ट्वेन्टी 20 सामना

392 0

पुणे : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पुढील वर्षी 5 जानेवारीला गहूंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ट्वेन्टी 20 क्रिकेट सामना रंगणार आहे. भारत – श्रीलंका यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी 20 क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातला दुसरा सामना 5 जानेवारीला पुण्यात दिवस रात्र रंगणार आहे.

एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित होत असलेला हा चौथा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी 20 सामना तर तेरावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना ठरणार आहे. एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय कसोटी, 7 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि 3 आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी 20 तसेच आयपीएलचे 51 सामने झाले आहेत. 2016 मध्ये झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी 20 सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघाचा पाच गडी राखून पराभव केला होता. 2020 मध्ये झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी 20 सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघाचा 78 धावांनी पराभव केला होता.

5 जानेवारीला क्रिकेटप्रेमींना भारत- श्रीलंका ट्वेन्टी 20 सामन्याचा आनंद घेता येणार आहे. सामन्याच्या तिकीट विक्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. पीवायसी हिंदू जिमखाना आणि गहूंजे येथील मैदानावर सकाळी 10 ते 6 या वेळेत तिकीटं उपलब्ध असतील.

Share This News

Related Post

sharad pawar

SHARAD PAWAR : “तो उल्लेख माझ्याबद्दल नव्हता गडकरींबद्दल होता; वादग्रस्त विधाने करणं हे या राज्यपालांचं वैशिष्ट्ये…!”

Posted by - November 24, 2022 0
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना राज्यपाल या पदावरून हटवण्याची मागणी जोर धरते…

शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे दुर्गाष्टमीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 5000 रक्तदात्यांचा सहभाग

Posted by - November 1, 2022 0
पुणे : दुर्गाष्टमीनिमित्त दर महिन्याप्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरात 5000 रक्तदानाचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून हे…
Shivajirao Adhalarao Patil

Shivajirao Adhalarao Patil : पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील ! शिरूर मतदारसंघातून पत्ता कट?

Posted by - February 17, 2024 0
पुणे : शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्यवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे.…
Shrikrishna Panse

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकपाल पदी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती

Posted by - January 8, 2024 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (University of Pune) लोकपाल पदी प्रा.(डॉ). सुरेश गोसावी यांनी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची…

#PUNE : कसबा विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे किरण कद्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Posted by - February 8, 2023 0
पुणे : आम आदमी पार्टीने उच्च शिक्षित, जनसामान्यात वावरणाऱ्या, कसबा विधासभेत ३० वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन आर्धी लढाई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *