आमदारांना घर देण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाचं भाजप खासदार गिरीश बापट यांनी केलं स्वागत

183 0

पुणे- मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अधिवेशनात केली. या घोषणेनंतर सर्वच स्तरातून विरोध केला जात आहे. मात्र भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे स्वागत केले आहे.

मुंबईतील गोरेगाव येथे आमदारांसाठी 300 एचआयजीची घरे (MHADA houses for 300 MLAs in Mumbai) बांधण्यात येणार आहेत. अशी घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारने केली. मुंबई परिसर वगळता ग्रामीण भागातील आमदारांना ही घरे दिली जाणार आहेत. भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारच्या निर्णयावर टीका होत असतानाच भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

लोकप्रतिनिधींना मुंबई म्हाडामार्फत विकत घरं देण्याच्या निर्णयात काहीच गैर नसल्याचं खासदार गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांसोबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

300 आमदारांना फुकटात घरं नाही – जितेंद्र आव्हाड

आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, आमदारांकडून घराची किंमत वसूल केली जाईल, त्यानंतरच त्यांना घरांचा ताबा मिळणार आहे. जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे. अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करून दिली आहे.

Share This News

Related Post

Documents

Caste Certificate : 45 दिवसांत मिळेल जात प्रमाणपत्र; ‘या’ कागदपत्रांसह करा अर्ज

Posted by - November 18, 2023 0
सोलापूर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजताना दिसत आहे. 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी (Caste Certificate) तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरु…
Omraje

घातपात की अपघात? ओमराजे अपघातातून थोडक्यात बचावले

Posted by - June 10, 2023 0
धाराशिव : धाराशिवमधून (Dharashiva) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर टिप्परच्या धडकेतून थोडक्यात बचावले आहेत. भरधाव टिप्पर…

मुंबईतील रेल्वे अपघातानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

Posted by - April 16, 2022 0
मुंबई- माटुंगा स्टेशनजवळ काल झालेल्या अपघातामुळे पुद्दुचेरी एक्स्प्रेसने गदग एक्स्प्रेसला धडक दिल्यानं पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले. त्यामुळे फास्ट ट्रॅकवरील…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रविवारी ‘आप’ चे शक्तिप्रदर्शन

Posted by - July 29, 2022 0
पुणे; आम आदमी पार्टी युवा आघाडीचे महाराष्ट्र युवा अधिवेशन पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृह या ठिकाणी संपन्न होणार आहे. रविवारी(ता. 31…

प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून मंजूर

Posted by - April 12, 2022 0
मुंबई- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. बोगस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *