आता बोला ! एका बैलाने घेतला गौतमीच्या ठसकेबाज नृत्याचा आनंद

1750 0

सबसे कातिल गौतमी पाटील नृत्य म्हणजे प्रेक्षकांची हुल्लडबाजी, टाळ्या, शिट्ट्या ! पण गौतमीचा असाही एक कार्यक्रम झाला जिथे समोर एक बैल उपस्थित होता. या बैलासमोर गौतमीने बहारदार नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मुळशीतील एका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त मांडव टिळा कार्यक्रमात चक्क गौतमी एका बैलासमोर नाचली. हा व्हिडीओ असल्याचं समोर आलं आहे. व्हिडीओ व्हायरलं झाल्यानं गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सुशील हागवणे युवा मंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चक्क कार्यक्रमासाठी बैल आणला होता. ‘बावऱ्या’ असं त्या बैलाचं नाव असून ‘बावऱ्या’ या बैलाने आतापर्यंत अनेक बैलगाडा शर्यती गाजवल्या आहेत. गावामध्ये सर्वांचा तो लाडका आहे. तसेच गावची शान असलेल्या या बैलाची नेहमीच चर्चा असते. ‘बावऱ्या’ बैलाने देखील गौतमीचा डान्स पाहून शेपटी उडवत दाद दिली. गौतमीने देखील एका बैलासमोर लचकत, मुरडत नृत्य केले. ते पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिकही जमा झाले होते.

पूर्वीच्या काळी लग्नाआधी दाराबाहेर मांडव घालण्याची प्रथा होती, त्या मांडवात नवऱ्या मुलाची वाजत गाजत बैलगाडीतून मिरवणूक येत असे. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी मिरवणूक न काढता गीतांचा कार्यक्रम ठेवला आणि बैलगाड्याचं प्रतीक म्हणून घरातील बैल कार्यक्रम स्थळी उभा केल्याचं आयोजक राजेंद्र हगवणे यांनी म्हंटल आहे.

Share This News

Related Post

उद मांजराला मिळाला नैसर्गिक अधिवास ; मुळशी वन विभागाकडून संरक्षण

Posted by - October 3, 2022 0
पुणे : हिंजेवाडी फेस टू मध्ये एमबीसी कॉर्ड्रेन कंपनी परिसरातील मागील काही दिवसांपासून दुर्मिळ प्रजातीचे उदमांजर आढळून येत होते. कंपनीच्या…

हनुमान चालीसा म्हणायला विरोध करायचा कारण काय ? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल

Posted by - April 23, 2022 0
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळेच पॅरापीटर्स बदलतायत. मग मोहित कंबोजच्या गाडीवर हल्ला करणे असेल किंवा पोलखोल यात्रेवर हल्ला करणे असेल…

Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेसकडे नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित करा

Posted by - November 14, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते पण त्या पक्षाकडे नैतिकता असेल तर त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार आणि…

तरुणाईच्या उत्साहात पुण्यात संविधान परिषद संपन्न

Posted by - November 26, 2022 0
संविधान दिनानिमित्त संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार, दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी संध्या. ६ वाजता एस एम जोशी सभागृह, नवी पेठ,…
BJP

BJP : भाजपकडून चार राज्यांचे नवे निवडणूक प्रभारी जाहीर ! ‘या’ मंत्र्यांवर देण्यात आली जबाबदारी

Posted by - July 8, 2023 0
मुंबई : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने (BJP) आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरू केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *