गणपती विसर्जन मिरवणूक : पोलीस प्रशासनाचे नियोजन फसले ? मिरवणुका वेळेत पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

232 0

पुणे : कोरोना काळामुळे दोन वर्षानंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . कालपासून सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुका अद्याप देखील सुरूच आहेत. पोलीस प्रशासन आणि मंडळांमध्ये समन्वयाच्या मोठ्या अभावामुळे मिरवणूक लांबल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले कि ,”पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ढोल ताशा पथकांमध्ये पडलेल्या अंतरामुळे विसर्जनासाठी वेळ लागत आहे. पोलिसांकडून सकाळपासून मंडळांना पुढे ढकलण्यात येत असून मिरवणूक वेळत संपवण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत असल्याच सांगितलं आहे.”

आज सकाळी नऊ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ अलका चौकामध्ये पोहोचले, एकंदरीतच दरवर्षीप्रमाणे यावर्षी मात्र कोणतेही नियोजन योग्य पद्धतीने झालेले नाही. शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक आणि पहिल्या मानाच्या गणपतीचे अर्थात कसबा गणपतीचे विसर्जन हे सव्वा चार वाजता झाले. तर मानाच्या पाचव्या गणपतीचे अर्थात केसरी वाड्यातील गणपतीचे विसर्जन हे रात्री साडेनऊ वाजता करण्यात आले. त्यामुळे शनिवारी सकाळी सात वाजून गेले तरीही प्रमुख मंडळे मुख्य विसर्जन मार्गावर पोहोचू शकली नाहीत. एकंदरीत परिस्थिती पाहता पोलिसांनी आता सक्तीने विसर्जन मिरवणुका वेळेत पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : धक्कादायक! रात्री लावलेल्या दिव्यामुळे वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 15, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune News) जुन्नरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Pune News) रात्रीच्या वेळी घराला लागलेल्या आगीत…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तत्काळ घ्या ; जिल्हा परिषद सदस्य असोसिएशनची मागणी

Posted by - October 11, 2022 0
पुणे : निवडणुका लांबल्याने विकासकामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्वरित घ्याव्यात, अशी मागणी जिल्हा…

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सायकल फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Posted by - January 7, 2023 0
पुणे : पुण्यात होणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने पुणे महापालिका सायकल क्लबतर्फे सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले.…

अनेक मुली आज ही शाळेपासून वंचित

Posted by - March 10, 2022 0
सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून सामाजिक परिवर्तन चळवळीचा पाया घातला. परंतु आजही अनेक मुली शाळेपासून वंचित राहत…

Special Report : पहिला श्रावणी सोमवार ! ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी…(VIDEO)

Posted by - August 1, 2022 0
आज श्रावणमासाचा पहिला सोमवार … श्रावणी सोमवार आणि या दिवशी करण्यात येणारे व्रत हे अत्यंत फलदायी असते . शिवपार्वतीची आज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *