भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा

405 0

नवी मुंबई- भारतीय जनता पक्षाचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये पीडित महिलेने धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

गणेश नाईक यांच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाणे आणि नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, गणेश नाईक यांच्या बरोबर 1993 मध्ये ओळख झाली. त्यानंतर नाईक आणि या महिलेचे प्रेमसंबंध सुरू झाले. नाईक हे पीडित महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. प्रेमाचे संबंध आल्यानंतर गणेश नाईक यांच्या बरोबर शारिरीक संबंध आले. सन 2004 रोजी दोघांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. या बाळाला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला माझे नाव देणार आणि दोघांनाही माझ्यासोबत ठेवणार असल्याचा शब्द नाईक यांनी दिला होता.

गरोदरपणाचे पाच महिने झाल्यानंतर नाईक यांनी एप्रिल 2007 रोजी बाळतंपणासाठी अमेरिकेती न्यू जर्सी शहरात पाठवले. अमेरिकेत ऑगस्ट 2007 रोजी प्रसुती झाली. अमेरिकेतील प्रसुतीमुळे ग्रीन कार्ड मिळाले आणि त्यामुळे मुलाला स्वत:चे नाव दिले असल्याचे पीडित महिलेने सांगितले. मुलगा झाल्यानंतर दोन महिन्यांनी गणेश नाईक हे स्वत: अमेरिका येथे आले होते. त्यानंतर आम्हाला नवी मुंबईत घेवून आले आणि नेरूळ येथे राहण्यासाठी फ्लॅट दिला असल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.

सन 2007 ते 2017 पर्यंत गणेश नाईक आठवड्यातून तीन दिवस पीडितेच्या घरी येत होते. याच दरम्यान त्यांनी पीडितेच्या इच्छेविरोधात तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. गेल्या काही वर्षापासून पीडितेकडून मुलाला वडिलांचे नाव द्यावे अशी मागणी केली असता नाईक यांनी रिव्हॅाल्वर दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप पीडित महिलेने केला. गणेश नाईक यांच्या पासून झालेल्या मुलाची डीएनए चाचणी करून त्याला वडिलांचे नाव आणि हक्क मिळावा अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.

पोलिसांकडे तक्रार करूनही गुन्हा दाखल न केल्याने पीडितेने राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली होती. राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर पोलिसांनी गणेश नाईकांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Share This News

Related Post

खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा

Posted by - April 13, 2022 0
अमरावती- खासदार नवनीत रवी राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खासदार नवनीत रवी…
Hingoli Triple Murder

Hingoli Triple Murder : तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं ! आई- वडील भावाला संपवलं; मात्र ‘त्या’ एका चुकीमुळं आरोपीचं बिंग फुटलं

Posted by - January 16, 2024 0
हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli Triple Murder) एक हादरवून टाकणाऱ्या तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीसदेखील हादरले आहेत.…

‘….. नाहीतर तुम्हाला महाग जाईल’, पोलिसांना दम भरणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

Posted by - April 12, 2023 0
गाडीला काळ्या काचा लावून पोलिसांना दमबाजी करणार्‍या तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. चौकशी केल्यावर तो तोतया पोलीस असल्याचे निष्पन…
Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडली; दाखला मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

Posted by - January 7, 2024 0
जालना : ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची कुणबी नोंद सापडली आहे.…
Eknath Shinde

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे 16 आमदार पात्र – राहुल नार्वेकर

Posted by - January 10, 2024 0
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल दिला. शिवसेना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *