अखेर गणेश नाईकांना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

321 0

नवी मुंबई- एका महिलेने बलात्कार आणि फसवणुकीचे आरोप केल्यानंतर गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच अखेर 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे गणेश नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांचे दोन अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्यांना कोणत्याही क्षणी पोलिसांकडून अटक होईल, असे सांगितले जात होते. ठाणे सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात गणेश नाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नवी मुंबईतील बेलापूर आणि नेरुळ इथे दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, अशी याचिका गणेश नाईक यांनी दाखल केली होती. या प्रकरणी सुनावणी करताना उच्च न्यायालयानं गणेश नाईक यांना जामीन मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण?

गणेश नाईक यांच्यासोबत प्रेमसंबंध असणाऱ्या एका महिलेनं तब्बल 27 वर्षांनी बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल आहे. तर रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यातही नाईक यांच्याविरुद्ध याच महिलेनं स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार महिला वाशी येथील बिग फ्लॅश स्पोर्ट्स क्लब येथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. यावेळी नाईक वारंवार क्लबमध्ये बैठकीसाठी येत असत. ओळख झाल्यानंतर ते मला संपर्क करत होते. सन 1995 पासून आमच्यातील मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यावेळी नाईक यांनी मला पारसिक हिल येथील बंगल्यात नेऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले.

पुण्यात फिरण्यासाठी गेल्यानंतरही आमच्यामध्ये संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले, असे या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. नोव्हेंबर 2006 मध्ये गणेश नाईक यांच्यापासून गर्भवती राहिल्यानंतर सहाव्या महिन्यात एप्रिल 2007 मध्ये त्यांच्या सांगण्यावरून मी न्यू जर्सी येथे राहण्यास गेले व 18 ऑगस्ट 2007 मध्ये मुलाला जन्म दिला. तो दोन महिन्यांचा असताना नाईक स्वत: मला व मुलाला घेण्यासाठी अमेरिकेला आले होते. त्यानंतर त्यांनी आम्हाला नेरूळमधील सीब्रीज टॉवर इमारतीत राहण्यास नेले. ते आठवड्यातून तीन वेळा घरी येत असत. त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक शोषण केले, असा या महिलेचा आरोप आहे.

 

गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच अखेर 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेत प्रचंड गोंधळ ! सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना घेरले

Posted by - December 22, 2022 0
नागपूर : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनातही पाहायला मिळाले. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना…

दुर्दैवी : मुसळधार पावसामुळे पुण्यात झाड पडून एका रिक्षा चालकाचा मृत्यू

Posted by - September 30, 2022 0
पुणे : चार वाजता सुमारास पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडल्यामुळे पुण्यातील विविध भागांमध्ये झाडपडीचा घटना…
Viral Video

Viral Video : शेळ्या चोरल्याच्या संशयावरून दलित व्यक्तीला उलटं टांगून मारहाण

Posted by - September 3, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावामध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना (Viral Video) घडली होती. यामध्ये शेळ्या…
Dhangar Reservation

Dhangar Reservation: धनगर समाजाला मोठा धक्का ! हायकोर्टाने ‘ती’ मागणी फेटाळली

Posted by - February 16, 2024 0
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाला (Dhangar Reservation) धक्का देणारा निर्णय दिला…

निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करणारा बिबट्या जेरबंद (व्हिडिओ)

Posted by - February 14, 2022 0
नाशिक- गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करत जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *