राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष,जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

156 0

मुंबई : राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याच्या निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.                                                                                                                                                                                         मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ‘सकाळपासूनच सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बोलतो आहे. त्याचबरोबर रात्री उशिरा देखील मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशीही चर्चा झाली आहे. धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. एकंदरीत राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत.                                   पण दुर्देवाने तशी वेळ आल्यास त्या ठिकाणी तत्काळ आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा पोहचतील असे प्रयत्न आहेत. आतापर्यंत ज्यांना स्थलांतरित केले आहे, त्यांना जेवण तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.’

Share This News

Related Post

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल

Posted by - June 28, 2022 0
मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने…

आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे पोहोचल्या थेट नागपूर अधिवेशनात

Posted by - December 19, 2022 0
नागपूर : आज पासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये आरोप प्रत्यारोप होतील, आंदोलने होतील. पण आजच्या पहिल्या…
Chhagan Bhujbal Threat

Chhagan Bhujbal Threat : भुजबळांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक

Posted by - July 11, 2023 0
पुणे : युती सरकारमधील कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांना (Chhagan Bhujbal Threat) एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपीने…

जम्मू काश्मीरमध्ये राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना २४ तासात कंठस्नान

Posted by - May 13, 2022 0
जम्मू- जम्मू काश्मीरमध्ये आज भारतीय सुरक्षादलाने वचनपूर्ती केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी (दि. १२) राहुल भट्ट या काश्मिरी पंडित युवकाची…

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय

Posted by - October 20, 2022 0
मुंबई : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय  • नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इस्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्र स्थापन करणार. शासनाला दर्जेदार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *