कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न डॉ. रजनी इंदुलकर यांची प्रमुख उपस्थिती

458 0

पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटर, सिग्निया आणि महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबीर पार पडले. ७५ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉ. रजनी इंदुलकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले.

पूर्व तपासणी मध्ये आढळून आलेल्या ऐकू न येण्याच्या क्षमतेनुसार लाभार्थ्यांना दिडशे श्रवणयंत्र मोफत बसविण्यात आले. या प्रसंगी डॉ. रजनी इंदुलकर, डॉ. सुनील जगताप, सिवान्टोस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ अविनाश पवार, किशालया चक्रवर्ती, सुमुख कसर्ले, वायडेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मधुसूदन भाडे, चव्हाण सेंटरच्या सीईओ दिप्ती नाखले, विजय कान्हेकर, दत्ता बाळसराफ, दिपिका शेरखाने तसेच कुमार वासनी, विशाल शाह, अमित पाटील हे उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी २०१३ पासून सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून तब्बल वीस हजार हून अधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे.

चव्हाण सेंटरच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे या करत असलेल्या या स्तुत्य उपक्रमाची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली असून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये सुद्धा त्याची नोंद झाली आहे. बालेवाडी येथे २०१८ मध्ये झालेल्या शिबिरात एका दिवसात म्हणजे अवघ्या ८ तासात तब्बल ४ हजार ८०० लाभार्थ्यांना श्रवणयंत्र बसविण्यात आले होते.

Share This News

Related Post

एसटी विलीनीकरणाची शक्यता मंत्रिमंडळाने फेटाळली

Posted by - March 3, 2022 0
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी मुख्य सचिवांच्या समितीने फेटाळली. 90 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण व्यावहारिक नसून त्यातून…

शरद पवार यांनी दगडूशेठ बाप्पांचे दर्शन घेतले नाही, कारण काय ?

Posted by - May 27, 2022 0
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात गेले.…
Uddhav Thackeray

‘माझ्याच लोकांनी धोका दिला, म्ह्णून ही परिस्थिती उद्भवली’, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांचे भावनिक उद्गार

Posted by - June 29, 2022 0
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान…

#WEDNESDAY : उद्या श्रीगणेशाची अशी करा पूजा ; बुधवारचा दिवस आहे शुभ, वाचा सविस्तर

Posted by - February 28, 2023 0
पंचांगानुसार बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. या दिवशी प्रथम पूजनीय देवाची विधिपूर्वक पूजा केली जाते. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार बुधवार बुध ग्रहाला…
Pune News

Pune News : पुण्यात जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार

Posted by - August 28, 2023 0
पुणे : आज पुण्यामध्ये (Pune News) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *