Babanrao Dhakane

Babanrao Dhakane : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

976 0

अहमदनगर : राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे (Babanrao Dhakane) यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर अहमदनगरमधील साईदीप रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी 1 ते उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत बबनराव ढाकणे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी हिंदसेवा वसतिगृहाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे.

बबनराव ढाकणे यांच्याविषयी थोडक्यात माहिती
अहमनगर जिल्ह्यातील दुष्काळी पाथर्डी तालुक्यातील अकोले या छोट्याश्या गावात 10 ऑक्टोबर 1937 बबनराव ढाकणे यांचा एका शेतकरी कुटूंबात जन्म झाला. शिक्षणासाठी पाथर्डीच्या हिंद वसतिगृहात राहताना चळवळीत ओढले गेले. गोवा समुक्ती संग्रामात भाग घेण्यासाठी शाळा नववीत असताना सोडून दिली. त्यानंतर 8 जुलै 1968 रोजी महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना मुख्यमंत्री बोलत होते. अचानक प्रेक्षक गॅलरीतून कसलासा आवाज झाला. खाली बसलेल्या आमदारांवर पत्रकांचा वर्षाव होऊ लागला. जोरदार घोषणाबाजी सुरु होती. गॅलरीतून खाली उडी मारायचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पकडलं होतं…ते बबनराव ढाकणे होते,तेव्हापासून बबनराव ढाकणे हे नाव चर्चेत आले. त्यानंतर एका उडीच्या प्रयत्नाने पाथर्डी तालुक्यातील अनेकांचे भविष्य उजळले. राजकीय जीवनात उतरायचं ठरवलं आणि काँग्रेसच्या विचारांकडे ते ओढले गेले.

1958 साली यशवंतराव चव्हाण भगवानगडावर आले होते तेव्हा त्यांची ओळख झाली. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता. 1967 साली राजकारणात पाऊल ठेवत टाकळीमानूर गटातून त्यांनी जिल्हापरिषदेसाठी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. पाथर्डी विधानसभा मतदारसंघातुन ते 1978 साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. पुढे ते पाच वेळेस आमदार राहिले. पुलोद मंत्रीमंडळात बांधकाम राज्यमंत्री म्हणून तर 1979 मध्ये पुलोद ग्रामविकास मंत्री म्हणूनही काम पाहिले. 1989 साली विधानसभेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी 10 नोव्हेंबर, 1989 साली बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जनता दलतर्फे नवव्या लोकसभेवर निवडून गेले. यावेळी त्यांनी केंद्रात चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधन मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या निधनामुळे अहमदनगर जिल्ह्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Share This News

Related Post

पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच ! गाडी हळू चालवायला सांगितल्यानं कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न; गृहविभागाने तातडीने धोरणात्मक पाऊले उचलावी – रूपाली चाकणकर

Posted by - January 16, 2023 0
पुणे : पुणे शहरात मागील अनेक दिवसांपासून कोयता यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे अगदी क्षुल्लक कारणांवरून कोयते हातात घेऊन दहशत…
Dhule Accident

Dhule Accident: रस्त्यातील वाहनांना उडवून हॉटेलमधील लोकांना चिरडलं; धुळे अपघाताचे CCTV आले समोर

Posted by - July 4, 2023 0
धुळे : राज्यात सध्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर (Dhule Accident) शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ एक भीषण अपघात झाला.…

पुणे जिल्ह्यातील भुकुम गावाची धुरा भाऊ-बहिणीच्या खांद्यावर

Posted by - April 23, 2023 0
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात एक अनोखा योगायोग पाहायला मिळाला आहे. मुळशीतील भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाचा कारभार आता बहीण-भाऊ…

फरार संदीप देशपांडेंचा मुंबई पोलिसांकडून कसून शोध, पोलिसांची खास पथके रवाना

Posted by - May 7, 2022 0
मुंबई- मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटलेले मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अद्याप शोध लागलेला नाही. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *