माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलबाहेर; ‘टायगर इज बॅक’ चे झळकले फलक आणि स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती VIDEO

314 0

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज अखेर जामीनावर सुटका झाली आहे. आर्थर रोड तुरुंगातूनअनिल देशमुख तब्बल 13 महिने 26 दिवसानंतर बाहेर आले आहेत. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी जेलबाहेर उपस्थित होते. यावेळी अनिल देशमुख यांच्या समर्थनार्थ ‘टायगर इज बॅक’, ‘ हौसला बुलंद रहे’चे फलक देखील झळकले आहेत.

देशमुख यांचा जामीन रद्द करण्याची सीबीआयने याचिका दाखल केली होती. हि याचिका काल मंगळवारी हाय कोर्टाने फेटाळल्यानंतर आज बुधवारी अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आले. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. आज सव्वा वर्ष म्हणजे 13 महिने 26 दिवसांच्या कोठडीनंतर ते बाहेर आले आहेत.

Share This News

Related Post

महावितरणची कंबरतोड प्रस्तावित दरवाढ; घरगुती वीज ग्राहकांना अतिरिक्त झटका बसणार ?

Posted by - January 27, 2023 0
पुणे : महावितरणने २०२३-२४ साठी ३७% वीज दरवाढीचा कंबरतोड प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ज्यामुळे आजच देशातील सर्वात…

औरंगाबादनंतर पुण्यातही आल्या कुरियरद्वारे तलवारी; दोन तलवारी जप्त (व्हिडिओ)

Posted by - April 2, 2022 0
पुणे- औरंगाबाद शहरामध्ये एकाचवेळी कुरियरने तब्बल 37 तलवारी आल्याची घटना घडलेली असतानाच पुण्यातही कुरिअरद्वारे दोन धारदार तलवारी आल्या. या घटनेने…

मोठी बातमी! क्रिकेटर केदार जाधवच्या वडिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Posted by - March 27, 2023 0
पुणे: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केदार जाधवच्या वडिलांना शोधून काढण्यात अखेर पोलिसांना यश आले असून मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोरपडीमध्ये…

पुणे : कऱ्हाटी येथील ग्राम बाल विकास केंद्राचे उद्घाटन

Posted by - September 24, 2022 0
पुणे : जिल्हा कुपोषणमुक्ती करण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील कऱ्हाटी येथे ग्राम बाल…

बोरिवलीमध्ये 4 मजली इमारत कोसळली ; ढिगार्‍याखाली नागरिक अडकल्याची भीती ; बचाव कार्य सुरू

Posted by - August 19, 2022 0
बोरवलीमध्ये एक चार मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर येते आहे . गीतांजली नामक ही इमारत बोरिवली पश्चिम भागातील साईनगर येथे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *