माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जे जे रुग्णालयात केले दाखल ; कारागृहात चक्कर येऊन कोसळले

242 0

मुंबई : शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपावरून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. आज सकाळी त्यांना कारागृहामध्येच अचानक चक्कर आली . त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, बीपी आणि इसीजीचा रिपोर्ट अबनॉर्मल आला असल्याचे समजते . दरम्यान तज्ञ डॉक्टर त्यांच्यावर सध्या उपचार करत आहेत.

भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर आरोपपत्र दाखल केला आहे. त्यामुळे न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यासह संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांचा देखील जामीन अर्ज फेटाळला आहे . अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे हे भ्रष्टाचार प्रकरणी आरोपी आहेत. यामध्ये सचिन वाजे माफीचा साक्षीदार झाल्यानंतर वाजे यांनी दिलेल्या जबाबानुसार अनेक गंभीर बाबींची स्पष्टोक्ती त्याच्याकडून मिळाली आहे . त्यामुळे देशमुख 100 कोटी वसुलीच्या कटातील मुख्य आरोपी असल्याचे ईडीने म्हटले आहे.

Share This News

Related Post

अरे बापरे ! मोक्कातील आरोपीला लॉकअप बाहेर काढून आरोपी पलायन करण्यास मदत केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे निलंबन

Posted by - February 3, 2023 0
पुणे : सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन केले आहे. मिळालेल्या धक्कादायक…

पोटनिवडणूक : आचारसंहिता पथकाची चिंचवड विधानसभा मतदारसंघात कारवाई

Posted by - February 18, 2023 0
पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीची आदर्श आचारसंहिता सुरू आचारसंहिता कक्षाकडून सार्वजनिक जागेवरील २७५ पोस्टर, १७४ बॅनर्स, ३ हजार ७२४…

Breaking News -भटिंडा येथील लष्करी तळावर गोळीबार.. 4 जणांचा मृत्यू

Posted by - April 12, 2023 0
भटिंडा येथील लष्करी तळावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही…

#PUNE : आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांचा इशारा

Posted by - February 24, 2023 0
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा कालावधी २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *