BIG NEWS : BCCI च्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती, तर कोषाध्यक्षपदी आशिष शेलार

371 0

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला, सचिव पदी जय शहा आणि कोषाध्यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

BCCI च्या पदाधिकारी निवडणुकीसाठी 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्यात आले होते. आज मुंबईमधील ताज हॉटेलमध्ये ही निवडणूक पार पडली. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने संतोष मेनन यांच्या जागी रॉजर बिन्नी यांचे नाव दिले.

रॉजर बिन्नी हे कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. रॉजर बिन्नी यांनी 1979 ते 1987 या कार्यकालामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी आजपर्यंत सत्तावीस कसोटी सामन्यांमध्ये 830 धावा केल्या असून 72 एक दिवसीय सामन्यांमध्ये 629 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये पाच तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकवले आहे. 27 कसोटींमध्ये 47 विकेट्स घेतलेले रॉजर बिन्नी यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये 77 विकेट्स घेतले आहेत. त्याचबरोबर त्यांचा 1983 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये देखील सहभाग होता. या विश्वचषक स्पर्धेमध्ये त्यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.

Share This News

Related Post

ठाकरे परीवाराविरोधात किरीट सोमय्या आक्रमक! ‘या’ प्रकरणावरून रेवदंडा पोलीस ठाण्यात करणार तक्रार

Posted by - January 1, 2023 0
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे  यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस…
Praful Patel

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा;उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

Posted by - February 14, 2024 0
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यसभेसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना…
Shinde - Fadanvis

‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ शिंदेच्या ‘त्या’ सर्वेची होतेय सर्वत्र चर्चा

Posted by - June 13, 2023 0
मुंबई : मुख्यमंत्री शिंदेंच्या जाहिरातीने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ज्यावेळी राज्यात फडणवीस सरकार होते. त्यावेळी देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र अशी…

राष्ट्रवादीचा पक्ष चिन्ह व नाव मिळवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे किती आहे संख्याबळ

Posted by - February 6, 2024 0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतलाय यामुळे शरद पवार…
Murder Video

Murder Video : तरुणीने लग्नाला नकार दिल्याने आरोपीकडून तरुणीची हत्या

Posted by - July 10, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी एका तरुणीची तिच्याच प्रियकराने भर रस्त्यात चाकूने वार करून हत्या (Murder Video) केली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *