ह्या कारणामुळे नीना गुप्ता यांनी ‘वध’ चित्रपट करण्यास दिला होकार; निर्मात्यांनी शेअर केला चित्रपटाचा BTS व्हिडिओ

363 0

बहुप्रतिक्षित आगामी क्राईम थ्रिलर ‘वध’ या चित्रपटात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांना पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये पाहायला मिळणार असल्याने याची चर्चा सर्वत्र आहे. अलीकडेच, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांचा उकृष्ट प्रतिसाद मिळाला. थ्रिल ने भरपूर असलेल्या या चित्रपटात, एक भावनिक घटक देखील आहे. जो प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करेल. तसेच, ‘वध’ चे कलाकार संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचे शिक्षण एकाच शाळेत झाले आहे. याची कल्पना फार कमी लोकांना आहे. एक काळ असाही होता जेव्हा नीना गुप्ता यांच्या उपस्थितीने संजय मिश्रा यांना वेड लावले होते.

निर्मात्यांनी आज ‘वध’ चित्रपटाचे बिहाइंड द सिन्स रिलीज केले. यामध्ये आपण नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांना त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांतील तसेच त्यांच्या शूटिंगच्या दिवसातील मजेशीर किस्से शेअर करताना पाहू शकतो. याबद्दल बोलताना नीना गुप्ता सांगतात, “मला ‘वध’ चित्रपट करायचा होता याचे मुख्य कारण म्हणजे मला संजय मिश्रासोबत काम करायचे होते.” केमिस्ट्रीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “तुमचे सहकलाकार चांगले असतील तर केमिस्ट्री आपोआप येते.”

यावर संजय मिश्रा म्हणाले, “आम्ही दोघेही एकाच संस्थेचे आहोत जीचे नाव एनएसडी (NSD) आहे. नीनाजी माझ्या सिनिअर आहेत. एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा मी नीना गुप्ता यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांना पाहताच मी झुडपात पडलो. त्यांनी माझ्या पत्नीची भूमिका साकारली आहे आणि मी त्यांना कधीच ‘तुम’ म्हणू शकत नव्हतो, मी त्यांना फक्त ‘आप’ म्हणायचो.” अशातच, हा चित्रपट अशा परिस्थितीवर आधारित आहे जिथे मुले म्हातारपणात असलेल्या आई-वडलांकडे दुर्लक्ष करतात. अशा पालकांचा दुःखद प्रवास तसेच नंतर त्यांना होणाऱ्या संघर्षांवर ‘वध’या चित्रपटाची कथा प्रकाश टाकते.

निर्मात्यांनी शेअर केला चित्रपटाचा BTS व्हिडिओ

दर्शकांनी संजय मिश्रा यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारताना पाहिलं असून प्रेक्षक आता त्यांना पहिल्यांदाच पडद्यावर एक अनोखी व्यक्तिरेखा साकारताना पाहतील. ‘वध’हा चित्रपट राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंग संधूद्वारा लिखित आणि दिग्दर्शित असून, जे स्टुडिओ आणि नेक्स्ट लेव्हल प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे. तसेच, लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. हा चित्रपट ९ डिसेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Share This News

Related Post

मुंबईमध्ये वातानुकूलित लोकल प्रवास तिकिटात ५० टक्के कपात, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा

Posted by - April 29, 2022 0
मुंबई – मुंबईकरांसाठी कडक उन्हामध्ये थंडावा देणारी आनंदाची बातमी. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांनी…

रॅपिडोबाबत राज्य सरकारने येत्या आठ दिवसात भूमिका स्पष्ट करावी; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Posted by - January 6, 2023 0
पुणे : रॅपिडो बाईक टॅक्सी ही सेवा बेकायदेशीर असून अशी सेवा देण्याचे धोरण राज्यात नाही. असं न्यायालयामध्ये परिवहन विभागाकडून सांगण्यात…

#CRIME NEWS : हैदराबाद मधून पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देण्याचा धमकीचा फोन; विक्षिप्तपणाचा कळस !

Posted by - February 13, 2023 0
पुणे : पुण्यातील गुगलचे ऑफिस बॉम्बने उडून देण्याच्या धमकीच्या फोन नंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या गुगल…

#FRAUD : बंगला खरेदी करण्याच्या बहाण्याने बनावट कागदपत्र बनवून बँकेतून घेतले 2 कोटी 21 लाखांचे गृह कर्ज, मालकाच्या लक्षात आल्यावर …

Posted by - January 28, 2023 0
पुणे : बंगला खरेदी करण्याच्या पाहण्याने बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल 2 कोटी 21 लाखांचे गृह कर्ज मंजूर करून घेऊन…

CRPF जवान आणि IT कर्मचारी दाम्पत्याला मिळाला माऊलींच्या महापूजेचा मान

Posted by - November 20, 2022 0
आळंदी, – तीर्थक्षेत्र आळंदी येथील कार्तिक वद्य एकादशी महापूजेचा मान पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील सीआरपीएफ जवान गोरक्ष बाळासाहेब चौधरी (वय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *