pune

600 किलो केमिकल मिश्रित पनीर जप्त; पुण्यात FDA मोठी कारवाई

1388 0

पुणे : पनीर म्हंटले कि नक्कीच आपल्या तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही. पनीर हा पदार्थ हमखास सगळ्यांना आवडतो. घरात जर काही सण किंवा काही कार्यक्रम असेल तर घरात बनवले जाते. मात्र आपण जे पनीर खातो ते भेसळयुक्त (Chemically mixed paneer) तर नाही ना? याची कधी खात्री केली आहे का? पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी (FDA) मोठी कारवाई करत 600 किलो केमिकल मिश्रित पनीर जप्त केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पिंपरी चिंचवडमधील (Pimpari Chinchwad) मे. महाराष्ट्र मिल्क डेअरीवर खंडणी विरोधी पथक आणि अन्न व सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी छापे टाकले. यावेळी तब्बल 600 किलो केमिकल मिश्रित पनीर जप्त करण्यात आलं आहे. यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, दुधाच्या पावडरमध्ये अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड (Acetic acid) टाकून अतिशय गलिच्छ पद्धतीने हे पनीर (paneer) तयार केले जात होते. मागच्या अनेक वर्षांपासून हा धक्कादायक प्रकार सुरु होता.

या प्रकरणी डेअरीचा मालक साजिद मुस्तफा शेखसह अन्य सहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार उघडकीस आल्याने लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Related Post

सुर्वे-म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी संशयतांना अटक; षडयंत्राबाबत तपासातून सत्य समोरी येईलच ! – प्रकाश सुर्वे

Posted by - March 15, 2023 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 11 मार्चला लोकप्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्या दरम्यान माजी नगरसेविका शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश…

110 कोटी रुपयांच्या बनावट कर क्रेडिट प्रकरणात महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून अटकेची कारवाई

Posted by - November 17, 2022 0
पुणे : महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर विभागाने कर चुकविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात विशेष तपास मोहिमेंतर्गत रामनारायण वरूमल अग्रवाल या व्यक्तीला ६३०…

#CHANDRAKANT PATIL : ” दादा, पुण्यातील विक्रम – वेताळ खेळ थांबवा !” आम आदमी पार्टीचे पालकमंत्र्यांना पत्रं !

Posted by - March 23, 2023 0
पुण्यात चाललेला ‘विक्रम- वेताळ’ हा खेळ बघितल्यावर कोथरुड, बावधन, पाषाण, बाणेर येथील सुज्ञ रहिवाशांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की,…
Mumbai Satra Court

बेस्ट बेकरी प्रकरणी दोन आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता

Posted by - June 13, 2023 0
मुंबई : गुजरातमधील (Gujrat) बेस्ट बेकरी प्रकरणात (The Best Bakery Case) मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या निर्णयात…
Jayant Patil

Jayant Patil: ‘या’ 10 कारणांमुळे जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार?

Posted by - June 25, 2023 0
सांगली : मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षातील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनामनानाट्यानंतर हे वाद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *