तीन मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्यावर पुण्यात पाचशे कोटीचा; प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

315 0

पुणे : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील उद्योगधंदे इतर राज्यात जात असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून राज्यासाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रोजेक्ट नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत असणार आहे.

पुणे जिल्ह्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगचे चांगले वातावरण तयार होईल. रांजणगाव येथील हे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर 297.11 एकरमध्ये पसरले जाईल आणि याच्या विकासासाठी 492.85 कोटी रुपये खर्च केले जातील.  यामधील २०७.९८ कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे.

प्रकल्पाचे लक्ष्य 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे आणि 5 हजार रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आहे. काही वेळापूर्वी या प्रकल्पाला नवी दिल्लीत मान्यता मिळाली असल्याचे फडणवीस यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. हा प्रकल्प पुढील ३२ महिन्यात कार्यान्वित होणार आहे.

प्रकल्पातंर्गत आयएफबी रेफ्रिजरेशनने काम सुरु केले आहे, 450 कोटींची या एकट्या कंपनीची गुंतवणूक आहे. इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक असे अनेक उद्योग राज्यात या निमित्ताने येणार आहेत.

Share This News

Related Post

मोठी बातमी ! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा मनसुख हिरेन खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार

Posted by - May 4, 2022 0
मुंबई- मनसुख हिरेन खून प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा…

रामनवमी निमित्त खासदार नवनीत राणा यांच्या रामभक्तांना अनोख्या शुभेच्छा.. पहा व्हिडिओ

Posted by - March 30, 2023 0
रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील जनतेला अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. नवनीत राणा यांचा हा खास…

महाराष्ट्रात विद्यापीठ खुल्या निवडणुका पुन्हा सुरू कराव्यात- अभाविपची मागणी 

Posted by - March 18, 2023 0
पुणे: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल दिनांक १७ मार्च २०२३ ला पुणे शहरात प्रवासासाठी आले. यावेळी, भारतातील…

सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांना रॅपीडो अॅपचा वापर न करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन, वाचा सविस्तर

Posted by - December 22, 2022 0
पुणे : मोटर व्हेईकल ॲग्रीगेटर रुल्स २०२० अनुसार मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा.लि. (रॅपीडो) यांनी दुचाकी व तिनचाकी टॅक्सीसाठी समुच्चयक…

#कौतुकास्पद : आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बनवली दिव्यांग बांधवांसाठी खास ब्लाइंड स्टिक, कसा होणार फायदा पहा

Posted by - March 25, 2023 0
नाशिक : इगतपुरी शहरातील महात्मा गांधी हायस्कूल येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ विद्यार्थ्यांनी दिव्यांग बांधवांना उपयुक्त ठरेल अशी ब्लाइंड स्टिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *