पुण्यात विद्युत मोटार कंपनीला आग ; अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी आग आटोक्यात

455 0

पुणे- पुणे महापालिकेजवळ असलेल्या विद्युत मोटार कंपनीच्या तळमजल्यावरील 3 हजार स्क्वेअर फूटच्या रेकॉर्ड रूमला आज बुधवारी सकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये रेकॉर्ड रूममधील ७० टक्के कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

घटनेबाबत पुणे अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी सांगितले की, मंगला टॉकीज शेजारील परिसरात चार मजली व्यवसायिक इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर विद्युत मोटार कंपनीचे रेकॉर्ड रूम आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात कागदपत्रे होते.

इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच सुरुवातीला कसबा अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र मोठ्या प्रमाणात आग आणि धूर असल्याने अग्निशमन दलाच्या आणखी चार गाड्या घटनास्थळी मागून घेण्यात आल्या. गाड्यांनी सर्व बाजूंनी पाण्याचा फवारा मारत सदर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

अग्निशमन दलाचे कर्मचारी राजू शेलार, राजाराम केदारी, मंगेश मिळवणे, सुनील टेंगळे, प्रताप फणसे यांच्या पथकाने आग आटोक्यात आणली.

Share This News

Related Post

Wardha News

Wardha News : मृत्यूनंतरही मरणयातना ! मृतदेहाचा बैलगाडीतुन खडतर प्रवास; काळीज हेलावून टाकणारा व्हिडिओ आला समोर

Posted by - August 27, 2023 0
वर्धा : जे लोक आपल्या आयुष्याला वैतागलेले असतात (Wardha News) ते लोक कधीकधी हे देवा एकदाचं मरण येऊन दे, सगळ्याच…

महत्वाची बातमी ! चारा घोटाळ्यातील दोरांडा प्रकरणात लालूप्रसाद यादव दोषी

Posted by - February 15, 2022 0
नवी दिल्ली- तब्बल 23 वर्षांपूर्वीच्या बहुचर्चित चार घोटाळ्यातील दोरांडा प्रकरणात राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे.…

MAHARASHTRA POLITICS : शिवसेना आणि शिवसेनेच निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं ? सुनावणी पुढच्या वर्षी

Posted by - December 12, 2022 0
शिवसेना नेमकी कुणाची आणि शिवसेना हे पक्ष चिन्ह नक्की कुणाचं याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी घेण्यात आली. एकनाथ शिंदे…

इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेले; ‘असा’ घडला घटनाक्रम ?

Posted by - March 3, 2022 0
विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीत न होताच राज्यपाल निघून गेले आहेत. सभागृहातील…

वेळेच्या आतच पगार संपतोय ? ऐनवेळी ‘Pay-Day Loan’ सुविधा मदत करू शकते , वाचा सविस्तर माहिती

Posted by - October 12, 2022 0
अनेक जण नोकरी करून सुद्धा आर्थिक अस्थिरतेने हैराण झालेले असतात. पगार झाला कि घरातल्या गरजेच्या वस्तूंवरच सर्व पगार खर्च होतो…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *