मुंब्रामधील एम.जे कंपाऊंडमध्ये अग्नितांडव, आगीत 4 ते 5 गोदामे जळून खाक

114 0

ठाणे- मुंब्रामधील एम.जे कंपाऊंड मधील भीषण आगीमध्ये गोदामे जळून खाक झाली आहेत. ही घटना आज पहाटे ४ वाजता घडली. या गोदामांमध्ये प्लास्टिकचे भंगाराचे सामान होते. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही मात्र भंगाराच्या गोदामांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

एम. जे. कंपाऊंड येथील एकूण १७ प्लॅस्टिक भंगार वस्तू असलेल्या पत्र्याच्या गाळ्यांना आग लागली होती. या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. दिल्लीमधील कालची आगीची घटना ताजी असतानाच मुंब्रामध्ये आगीची घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच शीळ डायघर पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी जे.सी.बी. मशीनसह तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. २ फायर वाहन, २ रेस्क्यू वाहन, २ वॉटर टँकर, १ जम्बो वॉटर टँकर, तसेच नवी मुंबईचे कोपरखैरणे अग्निशमन दलाचे १ फायर वाहन, १ जम्बो वॉटर टँकर यांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

Share This News

Related Post

आर्यन खानला मिळाला दिलासा, एनसीबी विशेष चौकशी समितीच्या अहवालात माहिती

Posted by - March 2, 2022 0
मुंबई- कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी एनसीबीनं स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष…

पुरामुळे निफाड सिन्नर रस्ता वाहतुकीसाठी बंद! नदीचा पुल पाण्याखाली

Posted by - July 14, 2022 0
नाशिक: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. निफाड तालुक्यातील नांदुर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.…

अजित पवार यांना कोरोनाची लागण, सोशल मीडियातून दिली माहिती

Posted by - June 27, 2022 0
मुंबई- एकीकडे महाविकास आघाडी सरकारवर सत्तेवरून पायउतार होण्याचे काळे ढग जमा झाले असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची…
Accident News

Accident News : दुर्दैवी ! पिकअप गाडीचा भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - February 29, 2024 0
मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमधील दिंडोरी या ठिकाणाहून एक भीषण अपघाताची (Accident News) घटना समोर आली आहे. यामध्ये 14 जणांचा…

पुणे महापालिकेकडून आगामी गणेशोत्सवात 150 फिरत्या विसर्जन हौदांची सुविधा

Posted by - August 16, 2022 0
पुणे : आगामी गणेशोत्सवासाठीचं नियोजन पुणे महापालिकेकडून सुरू झालं आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत १५० फिरते हौद उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *